Posts

Showing posts from September, 2020

जेम्स टाऊन व्हाया मार्टिन लूथर...

Image
जेम्स टाऊन व्हाया मार्टिन लूथर... -  September 09, 2020 मार्टिन लूथर या जर्मन  प्राध्यापक व धर्मगुरूने युरोपिअन धर्मक्रांतीचा उद्घोष केला. सन १५१७ मध्ये लूथरने धर्मसुधारणांचा जाहिरनामा प्रसिद्ध करून,युरोपातील प्रबोधन कालखंडाचा नारळ फोडला. पोप व चर्च यांच्या दमनकारी सत्तेला त्यानं दिलेल्या आव्हानामुळे युरोपचे भाग्य सर्वाथानं बदलेले. मार्टिन लूथर ना तत्त्वज्ञ होता,ना धर्मपंडित,तरी त्याच्या धर्मसुधारणांच्या विचारांचा प्रभाव अखंड युरोपवर पडला. कॉल्विनसारख्या अनेक धर्मसुधारकांनी लूथरकडून प्रेरणा घेतली. प्रोटेस्टेंट ख्रिश्चन या  नव्या ख्रिश्चन पंथाचे जनकत्व लूथरकडेच जाते. सनातनी व सुधारक ख्रिश्चनांची विभागणी अनक्रमे कॅथोलीक व प्रोटेस्टेंट अशी झाली. मार्टिन लूथरची ही धर्मक्रांती आजच्या अमेरिकेच्या निर्मितीतील एक प्रमुख कारणांपैकी एक आहे. युरोपातील ईतर राजसत्तांपेक्षा इंग्लंडच्या राजसत्तेने धर्मक्रांतीचा नेमका लाभ उठवला. इंग्लंडमधील धर्मक्रांतीला पेटवण्याचे काम धार्मिक नेत्यांपेक्षा तेथील सम्राटांनीच केले. सन १४८५ मध्ये हेन्री सप्तमच्या रूपाने टयुडोर वंशांची सत्ता इंग्लंडवर स्थाप...

भारतीय संविधान इंग्रजांनी बनविलेल्या इंडिया अधिनियमाची नक्कल (कॉपी) आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की कोणती राज्यघटना लिहिली?

Image
भारतीय संविधान इंग्रजांनी बनविलेल्या इंडिया अधिनियमाची नक्कल (कॉपी) आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की कोणती राज्यघटना लिहिली? १९३५ चा भारत कायदा हा भारतीय संविधानाचा एका मोठ्ठा भाग आहे एवढीच गोष्ट खरी आहे ! पण त्याला नक्कल म्हणणे चूक आहे . कारण १९३५ चा कायदा जसाच्या तसा घेतला गेला नव्हता तर त्याच्यात adaptations / फरक / बदल करून स्वतंत्र भारताला साजेसा आणि स्वतंत्र भारतात उपयोगी ठरू शकेल असा भाग वापरला गेला . पण त्याच बरोबर स्वातंत्र्याचा सरनामा (ज्याला आपण preamble म्हणतो हा भाग तर १९३५ च्या कायद्याचा भाग नव्हता !) तसेच १९२८ साली मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेला नेहरू अहवाल (नेहरू रिपोर्ट) सध्या संविधानात असलेली कितीतरी मूल्ये होती ती आपण अंगीकृत केलीत (उपयोगात आणली !) उदा. मूलभूत अधिकार , समानतेचा अधिकार , धर्मनिरपक्ष राज्य , कोणालासुद्धा फक्त धर्मावर आधारित स्वतंत्र मतदारसंघ दिले न जाणे व इतर . आंबेडकर घटनाकार,मसुदा समितीचे अध्यक्ष होते , त्यांनी तिला एक मूर्त स्वरूप दिले. संविधान बनविताना / लिहताना जी चर्चा झाली तिला योग्य मार्गावर ठेवून त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील...