भारतीय संविधान इंग्रजांनी बनविलेल्या इंडिया अधिनियमाची नक्कल (कॉपी) आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की कोणती राज्यघटना लिहिली?

भारतीय संविधान इंग्रजांनी बनविलेल्या इंडिया अधिनियमाची नक्कल (कॉपी) आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की कोणती राज्यघटना लिहिली?

१९३५ चा भारत कायदा हा भारतीय संविधानाचा एका मोठ्ठा भाग आहे एवढीच गोष्ट खरी आहे !

पण त्याला नक्कल म्हणणे चूक आहे .

कारण १९३५ चा कायदा जसाच्या तसा घेतला गेला नव्हता तर त्याच्यात adaptations / फरक / बदल करून स्वतंत्र भारताला साजेसा आणि स्वतंत्र भारतात उपयोगी ठरू शकेल असा भाग वापरला गेला . पण त्याच बरोबर स्वातंत्र्याचा सरनामा (ज्याला आपण preamble म्हणतो हा भाग तर १९३५ च्या कायद्याचा भाग नव्हता !) तसेच

१९२८ साली मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेला नेहरू अहवाल (नेहरू रिपोर्ट) सध्या संविधानात असलेली कितीतरी मूल्ये होती ती आपण अंगीकृत केलीत (उपयोगात आणली !)

उदा. मूलभूत अधिकार , समानतेचा अधिकार , धर्मनिरपक्ष राज्य , कोणालासुद्धा फक्त धर्मावर आधारित स्वतंत्र मतदारसंघ दिले न जाणे व इतर .

आंबेडकर घटनाकार,मसुदा समितीचे अध्यक्ष होते , त्यांनी तिला एक मूर्त स्वरूप दिले. संविधान बनविताना / लिहताना जी चर्चा झाली तिला योग्य मार्गावर ठेवून त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील भारताला अपेक्षित आणि योग्य अश्या सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून गरज तिथे त्या योग्य प्रकारे बदलून अशी आज आपण बघत असलेली घटना त्यांनी "draft" केली. आणि आपण असे का करत आहोत याला मुद्देसूद अशी कारणे सुद्धा दिलीत.

भारताचे संविधान जगातील सगळ्यात विस्तृत असे document.आहे.

त्यात कितीतरी राष्ट्रांच्या संविधानातील उत्तम provisions.चा भारताला साजेसा असा उपयोग केला गेलेला आहे पण त्याला नक्कल म्हणणे पूर्ण चूक राहील !

कारण कोणत्याही राष्ट्रात एवढ्या जाती , जमाती , धर्म , परंपरा , भाषा नव्हत्या / नाहीत .

जर भारताला अखंडत्व द्यायचे असेल तर आपल्याला कितीतरी गोष्टींना न्याय द्यावा लागेल आणि असा न्याय देणे कॉपी करण्यासारखे वाटते तेवढे सोप्पे नक्कीच नाही .

👉ज्याने श्रम घेतले व संविधान सिद्धध केले त्या व्यक्तीला त्याचे योग्य श्रेय देण्यात काही जणांना काय ऑब्जेक्शन आहे?

👉Jyana shanka ahe tyanchya janm honyat …

Jase dr,nurse,wardboy etc

Kase vatate, rag yetona, mag ase akkalshunya prashn vichartana hatala kay jatiy maharog hoto ka.

♨️२६ जानेवारी १९५० पासून आपली राज्यघटना देशभरात अमलात आली. तेव्हापासून आज पर्यंत – ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. इतक्या जाती-धर्मानी युक्त असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही, कुठल्याही यादवीशिवाय प्रगतीपथावर आहे, ह्याचं श्रेय आपल्या राज्यघटनेलाच.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.

इंग्लिश Quora वर देखील असाच प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नावर दोन वेगवेगळी उत्तरं दिली गेली – आणि ही दोन्ही उत्तरं केवळ awesome आहेत.

===

पाहिलं उत्तर आहे तेजस्विता आपटे याचं.

त्या म्हणतात :

ह्या अश्या प्रश्नांनाच मी “अपमानास्पद” समजते.

तुम्हाला काय वाटतं – घटना निर्माण करणारे डॉ. आंबेडकर – जे देशातील सर्वात हुशार व्यक्ती होते – एवढे निष्काळजी असतील का की इतर देशाची घटना जशीच्या तशी कॉपी करतील?

तुम्हाला काय वाटतं – आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) – टिकला आहे, प्रगती करतोय – ते एका “कॉपी” केलेल्या राज्यघटनेच्या बळावर?

तुम्हाला खरंच असं वाटतं का की जगातील सर्वात मोठी लोकशाही, इतर देशांच्या घटनेला कॉपी करून बनवलेल्या घटनेच्या बळावर अशीच एका तुक्क्यामुळे व्यवस्थीत कार्यान्वित आहे?

समजून घ्या – सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झालं.

प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी modify केली गेली, त्यानुसारच accept केली गेली.

कुठलाही अभ्यास केल्याशिवाय “असे” आरोप करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.

थोडीशी कल्पना हवी असेल तर एक fact सांगते – आपली राज्यघटना ६६ वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. आणि जगभरातील राज्यघटनांचं सरासरी वय आहे – १७ वर्ष ! ह्यावरूनच हे कळेल की राज्यघटना लोकांसाठी suitable नसेल तर काय होतं.

===

अनुप कुंभारीकर यांनी या प्रश्नावर उत्तर दिलंय :

चाकाचा शोध पुनःपुन्हा नं लावणे (म्हणजेच, आधी जे चांगलं चांगलं शोधल्या गेलंय, ते कुठलाही आडपडदा नं ठेवता वापरणे) हे हुशार लोकांचं लक्षण आहे.

होय – भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांच्या मदतीने/आधारानेच बनवली गेली आहे. पण ह्याचा अर्थ जर “भारतीय राज्यघटना ही कॉपी केलेली आहे” असा काढल्या जात असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.

ह्यावर मी काय बोलू? स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आरोपाचं awesome उत्तर दिलं आहे :

“It is said that there is nothing new in the Draft Constitution, that about half of it has been copied from the Govt. of India Act of 1935 and that the rest of it has been borrowed from the Constitutions of other countries. Very little of it can claim originality.

One likes to ask whether there can be anything new in a Constitution framed at this hour in the history of the world. More than hundred years have rolled over when the first written Constitution was drafted. It has been followed by many countries reducing their Constitutions to writing. What the scope of a Constitution should be has long been settled. Similarly what are the fundamentals of a Constitution are recognized all over the world. Given these facts, all Constitutions in their main provisions must look similar. The only new things, if there can be any, in a Constitution framed so late in the day are the variations made to remove the faults and to accommodate it to the needs of the country. The charge of producing a blind copy of the Constitutions of other countries is based, I am sure, on an inadequate study of the Constitution…

As to the accusation that the Draft Constitution has produced a good part of the provisions of the Govt. of India Act, 1935, I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds any patent rights in the fundamental ideas of a Constitution…provisions taken from the Government of India Act, 1935, relate mostly to the details of administration.

— 4th Nov 1948, Constituent Assembly

घटनाकार डॉ. आंबेडकर इथेच थांबले नाहीत ! ते ह्याही पुढे गेले आहेत आणि त्यांनी “एक संपूर्ण नवी राज्यघटना देशासाठी जास्त चांगली असली असती का?” ह्याही प्रश्नाचं दमदार उत्तर दिलंय :

“I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.”

मी पुढे हे म्हणेन – कुठल्याही देशाला, स्वतःची राज्यघटना implement करण्याची संधी क्वचितच मिळते. जर ह्या संधीचं सोनं केलं नाही तर पुढे रक्तपात होतो. आपल्या देशात अहिंसक मार्गाने राज्यघटना अमलातही आली आणि अनेकांना रक्तपाताशिवाय समानतेची हमी मिळाली.

(टीप: इंग्लिश मजकूरासाठी क्षमस्व)

👉तुम्ही खूप अभ्यासपूर्ण उत्तर दीले आहे

👉एखाद्या कृतीचे श्रेय ज्याचे त्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो. तो या प्रश्नकर्त्याकडे नाही. साधे रेसिडेंशियल सोसायटीचे बाय -लॉ बनवताना किती विचार करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात. इथे देशाचे संविधान घडवायचे असेल तर किती कष्ट घ्यावे लागतील?डॉ बाबासाहेबांनी ही सर्व मेहनत घेतली त्याची काहीच दखल आपण घेणार नाही?या प्रश्नामागे असलेली मळमळ वेगळीच आहे. आरक्षणामुळे रोजगार गेलेले लोकअसे प्रश्न विचारून मनाचा कोतेपणा दाखवतात.

👉आपले प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. मला असे वाटते, भारतीयांनी अजूनही जातींची कोती वृत्ती सोडलेली नाही. असे प्रश्न निर्माण करणे त्याचाच एक भाग आहे.

👉मंदिर अधिग्रहण कायदा- ब्रिटिश राजवटीत ल

2. इंडियन मोटर अक्ट - ब्रिटिश राजवटीत ला

3.इंडियन पेनल अॅक्ट(मुळात आयरिश पेनल ऍक्ट)-ब्रिटिश राजवटीत ला

4.इंडियन वेपण ऍक्ट- ब्रिटिश राजवटीत ला

5.इंडियन फॉरेस्ट अँक्-ब्रिटिश राजवटीत ला

6. गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट(वॉरन हस्तींग्ज)-ब्रिटिश राजवटीत ला

7. आर्टिकल ३७७ (२०१६ मध्ये अमेंड झाला)-ब्रिटिश राजवटीत ला

8.इंडियन टॅक्स सिस्टम पण ब्रिटिश राजवटीत असलेल्या टॅक्स सिस्टम शी साधर्म्य साधते

आणि एक महत्त्वाची गोष्ट संविधान पूर्णतः बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही…

👉आपण खूप सय्यमी उत्तर दिले आहे. प्रश्न काय आहे एवढेच पाहून समर्पक उत्तर देणे हे नक्कीच तुमची संयमित बुद्धीमत्ता दर्शवते. नाहीतर तुम्हीच पहा फक्त राज्य घटने बद्दल प्रश्न विचारला म्हणून प्रश्न करता हरामखोर ठरतो आहे.

बऱ्याच जणांनी राज्य घटना कधीच वाचलेली नसते पण ऐकिवात अर्थातच समविचारी अथवा समाविचारी व्यक्तींच्या तोंडूनच त्यामुळे फक्त महानता किंव्हा हिनता दाखवण्यासाठी सहमती आणि विरोध करताना फक्त तोंड सुख घेतले जाते.

आपल्या योग्य माहिती आणि निष्ठेने आपण उत्तर दिले आपले आभार.आपली राज्य घटना खरच महान आहे पण बाबासाहेब म्हणाले त्या प्रमाणे तिची अंमलबजावणी योग्य व्यक्तींच्या हाती असणे हे महत्वाचे.

👉सविस्तर पणे छान उत्तर दिले सर ! मुद्दाम खोडसाळपणाने प्रश्न विचारले ला दिसतो . कोट्यावधी कावळ्यांच्या पंखानी सुर्य झाकण्याचा प्रयत्न केला तरी सुर्य तेजस्वीच राहील.सविंधान , धर्मांतर, मनुस्मृती., वगैरे वगैरे हजारोवेळा हे विषय आक्षेपार्ह पध्दतीने र्लोकांपुढे गैरसमज व द्वेष सात्यत्याने ठेवण्याकरीता ७०वर्षा पेक्षा अधिक काळापासून आणले जात आहेत.

खरोखरच जिज्ञासा असेल तर भरपूर माहिती साहित्य पूस्तके उपलब्ध आहेत तसेच बाबासाहेबांनी स्वतच जवळ जवळ सर्व आक्षेपांचे समाधानकारक दिलेल्या उत्तरांबाबतही माहिती आहे, अनेक ग्रंथ आहेत.त्या ज्ञानमहासागरात स्वतला झोकून द्यावे बूध्दी निर्मळ होईल व विवेकी विचाराचे रत्ने मिळतील तसेच जीवनात क्रांतीपर्वाचा प्रारंभ होईल.

👉प्रश्न कर्त्यास जर संविधान जसेच्या तशी नक्कल वाटते तर बाबासारेबां बरोबरचे मसुदा समितीचे ६ सदस्य व काँन्स्टिट्युएंट असेम्ब्लीचे २९९ सदस्यांनी बाबासाहेबांना विरोध कसा केला नाही? निदान बाबासाहेबांचे विचारांशी साम्य नसलेले मनुस्म्रुतीचे समर्थक शामा प्रसाद मुखर्जींनी काँनस्टिट्युएंट असेंम्ब्लीत या ड्राफ्टला विरोध का केला नाही?

आता सत्य जाणून घेण्यासाठी प्रश्न कर्त्याने काँन्स्टिट्युएंट असेंम्ब्लीचे एकमेव हयात सदस्य टीएम कलियानन यांना तामीळनाडूत सालेम येथे जाऊन भेटून खात्री करून घ्यावी.

त्यांची ओळख:-


👉कसंय नावे ठेवणा-यांकडे तर असला बरोबरीचा नेता नाही ..बाबासाहेबांएवढं कोण शिकलं आहे का ते जेवढे शिकले तेवढ कुणाकडे च ज्ञान नाही.जगात त्यांच्या नावाचा गाजावाजा केला जातो उगीच नाही खरं तर या नावे ठेवणा-यांनीच copy paste केलं आहे बुध्दाच्या मुर्तीचं देवामध्ये रूपांतर करून.जेवढे मोठमोठाली मंदिरे आहेत मग ती पंढरपूर असो की तिरुपति तिथे ब्राम्ही पाली भाषेत लेख आढळून येतो अजुन सुध्दा.

👉जर तुम्हाला खात्री आहेच तर घ्या पुराव आणि जा कोर्टात. होऊद्या पुन्हा अयोध्ये नंतर तिरूपती आणि पंढरपूर. अहो जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे बुद्धाच्या खूप आधीचे आहे. पाली भाषेतील शिलालेख आज लिहून ठेवले तर ते बुद्ध काळातले होत नाहीत.

👉काय पुरावा आहे बुद्ध मुर्त्या हिंदू देवता मध्ये परावर्तित केल्याचा उगाच विना हातापायाच्या गोष्टी बोलू नये..There is a technique of carbon dating of monuments through which we can predate those monuments and accordingly Buddha was born in later timeline compared to the construction of these sacred monuments also Buddha is himself a Kshatriya so you may keep your absurd theory to yourself..

👉वाह ! छान समर्पक उत्तर.

👉यात दोन चूक विधाने आहेत
  1. भारतीय संविधान ही नक्कल नाही यात स्वतंत्र भारताचाआत्मा दिसतो (आज हे संविधान संपवण्याचा ..चालू असला तरी तो फसले हे पण नक्की ) यास्तव ही नक्कल असूच शकत नाही
  2. बाबासाहेब हे केवळ drafting समिती चे ..होते ते आपल्या कडून एकही कलम इत्यादी त्यात घालू शकत नव्हते। प्रत्येक कलम हे दीर्घ चर्चेनंतर संमत झाले ते फक्त ह्या संविधानात त्यांनी अंतर्भूत केले।

याकरणांनी हा प्रश्न गैरसमजुती वर आधारित आहे!!

श्रीराम।


♨️भारताचे संपूर्ण संविधान फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीले आहे का?

संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटना एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करतात..

सदर प्रश्नांविषयी विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे…पुढील काही तथ्य वाचून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी आशा बाळगतो..

१) मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णम्माचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात,"

सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम बाबासाहेबांनी पार पाडले. ते निःसंशय आदरास पात्र आहेत.याचा अंतिम परिणाम असा झाला की, या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डाँ.आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निःसंशय, अत्यंत समर्थपणे पूर्ण केले, याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत..

२)घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,

"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."

काही जण बाबासाहेबांनी जे मनात आलं ते भारतावर लादून दिलं, गरज नसताना आरक्षण दिल इत्यादी आणि अशा समजुतीतून संविधानाचाच विरोध करतात…पण हे त्यांना माहीत नसते की बाबासाहेबांनी मसुदा तयार केल्यावर प्रत्येक आर्टिकल ला मंजूर करून घेण्यासाठी कित्येक चर्चासत्र झालेत, त्यात बाकी महत्वाचे लोक देखील होते, त्या सगळ्यांना प्रत्येक आर्टिकल चं महत्व आणि गरज बाबासाहेबांना पटवून द्यावी लागली त्या नंतर च सगळं मान्य झालं

(संदर्भ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ,: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन).

….जय भीम….

👉खुपच महत्वपूर्ण माहिती दिलीत सर. बाबासाहेबांच्या गौरवपात्र प्रत्येक कृतीला बुरसट विचारसरणींचे लोक नेहमी तौलानिक दृष्टीकोनातून पहाताना दिसत आहे. हे जाणून बुझून आणि हेतुपुरस्सर करतात हे विशेष.

आंबेडकरी विचारसरणीचे लोक, अनुयायी आहेत की नाही याची बहुतेक त्यांना चाचपणी करायची असते की काय. नसल्यावर टिकाटिप्पणी करणे,मापं काढणे हे चालू करणे. जाती विरहित आणि अस्सल उच्च दर्जाचे भारतीयच डॉ. आंबेडकरांचे श्रेष्टत्व मान्य करतील, उपकाराची जाण ठेवतील.

सडेतोड उत्तराबद्दल धन्यवाद.

👉मोइनजी,

छान सविस्तर माहीती.

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते हेच आपल्याला ठाूक असतं, मात्र इतर संविधानाच्या इतर ४ पेक्षा अधिक समित्यांचेही ते सदस्य होते ही बाब बऱ्याच जणांना माहिती नसते.

👉मी जेव्हा केव्हा या विषयावर ऐकतो, वाचतो, पाहतो , तेव्हा मला एक प्रश्न पडतो?

जिथे भारताचे भविष्य लिहले जात होते तेव्हा इतर सदस्य कोणत्या न कोणत्या कारणाने सहभागी का होत नसावे ? भारताच्या भविष्यापेक्षा ह्या लोकांना इतके कोणते दुसरे महत्वपूर्ण काम असावे?

महत्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना मधुमेह व इतरही व्याधी असताना ते पण कारण सांगून मोकळे होऊ शकले असते।

👉हे असं काही वाचल्यावर लोक अशी समजूत करून घेतात की बाबासाहेबांनी जे मनात आलं ते भारतावर लादून दिलं, गरज नसताना आरक्षण दिल इत्यादी आणि अशा समजुतीतून संविधानाचाच विरोध करतात…पण हे त्यांना माहीत नसते की बाबासाहेबांनी मसुदा तयार केल्यावर प्रत्येक आर्टिकल ला मंजूर करून घेण्यासाठी कित्येक चर्चासत्र झालेत, त्यात बाकी महत्वाचे लोक देखील होते, त्या सगळ्यांना प्रत्येक आर्टिकल चं महत्व आणि गरज बाबासाहेबांना पटवून द्यावी लागली त्या नंतर च सगळं मान्य झालं… हे जर मोईन आपण आपल्या उत्तरात सामील कराल तर थोडं बर होईल नाही का?

👉मोईन फक्त अपवोट करू नको, आपल्या उत्तरात हा मजकूर समाविष्ट देखील कर.

👉विहित वेळेत घटना कायद्याच्या भाषेत लिहणे हे एक अतिशय महत्त्वाचे काम होते… पाकिस्तान मध्ये घटना लिहण्याची प्रक्रिया बराच काळ चालली आणि पुढे ती अर्धवट स्वरूपात लागू करण्यात आली, त्यामुळे आजपर्यंत कुणाला नेमका कोणता अधिकार आहे असा गोंधळ सुरू आहे.

👉खुपच छान दादा, तुझी लेखनशैली अप्रतिम आहे.

♨️अजिबात नाही.

पुढील उत्तर वाचण्याआधी disclaimer देत आहे.

१) जे भावनाप्रधान लोक आहेत त्यांनी इथून पुढचे उत्तर वाचू नये.

२) काही तांत्रिक बाबींना माझ्या शब्दसंग्रहात मराठी शब्द मला चटकन सापडणार नाही, तेव्हा बरेच इंग्रजी शब्द येतील त्याबद्दल क्षमस्व.

३) संपूर्ण उत्तर थोडे मोठे होईल तेव्हा सारांशाचा भाग हा शक्यातो bold मध्ये देण्याचा प्रयत्न करिन.

४) संदर्भ; तसेच कोणाला विषयाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर उत्तराच्या शेवटी काही संदर्भ देत आहे.

बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिले असे म्हणणे म्हणजे, भारताच्या क्रिकेट इतिहासात दोनच लोक क्रिकेट खेळले ते म्हणजे, कपिल देव व महेंद्रसिंग धोनी आणि त्यांनीच वर्ल्ड कप जिंकून दिला असे म्हणण्यासारखे आहे.

संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे, याबद्दल शंका नाही.

परंतु जी व्यक्ती थोडातरी कायदा जाणते ती व्यक्ती, कोणत्याही इतिहासाची माहिती नसताना देखील, हे सांगेल कि संपूर्ण देशाचे संविधान एक माणूस एकहाती लिहील याची शक्यता शून्य टक्के आहे.

ज्यांना याविषयावर अधिक जास्त माहिती हवी असेल त्यांनी उत्तराच्या शेवटी काही उपयुक्त links देत आहे, तिथे चक्कर टाकावी.

उत्तर :

प्रस्तावना:

कोणत्याही देशाचे संविधान, कायदे इत्यादी हे कधीच एक व्यक्ती लिहीत नाही व ह्या सर्वांची जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर सोपवणे हे तांत्रिक दृष्ट्या देखील अतिशय चुकीचं आहे. अर्थात भारताच्या बाबतीत देखील असं अजिबात झालेलं नाही.

संविधान निर्मिती, कायदे, घटनात्मक तरतुदी ह्या मंजूर करण्याकरता सर्वात महत्वाचा घटक हा दावे, प्रतिदावे, वादविवाद हाच असतो. संविधान निर्माण व संबंधित तरतुदी मंजूर करून घेणे याकरिता अनेक समित्या असतात ज्या विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. अनेक कायदेतज्ञ् हे सल्लागार म्हणून नेमले जातात अशी बरीच लांबलचक प्रक्रिया असते आणि कोणत्याही एका घटकाचे त्यातील योगदान हे नाकारता येत नाही किंवा त्याकडे डोळेझाक करता येत नाही.

इतिहास:

भारताच्या संविधान सभेची स्थापना हि ६ डिसेंबर १९४६ रोजी झाली. सच्चीदानंद सिंह यांची या सभेचे तात्पुरते अध्यक्ष (president ) म्हणून निवड झाली.

यानंतर २ च दिवसात डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली व त्यांच्याच नेतृत्वाखाली संविधान सभेचे सर्व कामकाज चालू राहिले. या संविधान सभेचे एकूण संख्याबळ हे ३८९ सदस्य एवढे होते जे फाळणीनंतर २९९ एव्हडेच उरले.

तसहि मुस्लिम लीगच्या सदस्यांनी सुरुवातीपासूनच संविधान सभेत भाग घेण्यास बहिष्कार घातला होता. पुढे फाळणीनंतर तर त्यांच्या सहभागाचा प्रश्नच उरला नाही.

यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे संविधान सभेचे प्रमुख सल्लागार नेमणे.

बेनेगल राव यांची संविधान सभेचे प्रमुख सल्लागार व तज्ञ् म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनीच भारताचे Draft constitution लिहिले.

तेव्हा जर संविधान कोणी लिहिले? या प्रश्नावर कोणाला एकालाच श्रेय द्यायचा अट्टहासच करायचा असेल, तर भारताचे संविधान हे बेनेगल राव यांनी लिहिले. आंबेडकरांनी नाही.

याच बेनेगल राव यांनी लिहिलेल्या मसुद्याची तपासणी करायला व त्यात दुरुस्त्या करायला संविधान सभेने ७ सदस्यीय समिती नेमली. ज्याचे चेअरमन होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. याच समितीत डॉ आंबेडकरांखेरीज आणखीनही ६ सदस्य होते. त्यांचे योगदान हे आंबेडकरांच्या तुलनेत बरेच कमी होते.

त्यांची नावे खालील प्रमाणे :

श्री अलादी कृष्णास्वामी अय्यर

श्री एन. गोपालस्वामी आयंगर

श्री क.मा. मुंशी

श्री सैयद महमद सादुल्ला

श्री बी.एन. मित्तर

श्री डी.पी. खेतान

हि समिती हि संविधान निर्माणाकरिता स्थापन केलेल्या १७ प्रमुख समित्यांपैकी सर्वात महत्वपूर्ण समिती होती. आंबेडकरांचा विविध देशांचे कायदे व संविधान याबद्दल दांडगा अभ्यास होता. म्हणून महात्मा गांधींनी आंबेडकरांच्या नावाला प्रमुख पसंती दर्शवली. या समिती मार्फत प्रार्थमिक बदल व दुरुस्त्या करण्याचे काम चालू राहिले ज्यात सर्वात जास्त योगदान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते. परंतु हे कितीही झाले तरी हे केवळ draft constitution होते.

तांत्रिक बाबी:

कोणताही कायदा, घटनात्मक तरतुदी या संविधानाचा भाग तेव्हाच बनतात जेव्हा त्याकरिता नेमण्यात आलेल्या सभेत त्या बहुमताने मंजूर होतात. हि सभा म्हणजेच भारताची संविधान सभा, ज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ह्या सभेचे फक्त एक सदस्य होते. यात पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, असे कितीतरी प्रमुख सदस्य होते ज्यांचे संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांच्या इतकेच तोलामोलाचे योगदान आहे. तसेच उर्वरित २९९ सदस्यांपैकी अनेक सदस्य आपापले योगदान यात वेळोवेळी देत राहिले.

यामुळे मूळ draft constitution व Final constitution यात कितीतरी आमूलाग्र फरक पडत गेले. अनेक तरतुदी हटवल्या गेल्या अनेक तरतुदीत सुधार झाले, अनेक नवीन insert केल्या गेल्या. याच सर्व कामकाजाचे तपशील म्हणजे "संविधान debates", ज्याचे अनेक खंड उपलब्ध आहेत. शिवाय लोकसभेच्या अधिकृत website वर देखील हे सर्व उपलब्ध आहेत. याची नुसती व्याप्ती जरी बघितली तरी आपल्या लक्षात येईल, कि मूळ draft constitution नंतर देखील किती मोठ्या प्रमाणात संविधानात बदल होत गेले व यात सर्व सदस्यांचे किती योगदान आहे. सर्वांचे संदर्भ उत्तराच्या शेवटी देतचं आहे.

हे सर्व दावे प्रतिदावे आणि वाद विवाद हेच कोणत्याही संविधान / कायदे याकरिता महत्वाचे असतात व त्यानेच ते अधिक सर्वसमावेशक असे बनते. आपले दुर्दैव असे कि संविधान निर्मिती झाली तेव्हा काँग्रेस सोडून विरोधी पक्षचं नव्हता. तेव्हा कितीतरी प्रसंगी, चांगले प्रतिदावे असताना सुद्धा काँग्रेस मधील काही सदस्यांनी धरलेल्या हट्टापायी ते मुद्दे इतरांनी सोडून दिले. या हट्टामध्ये पंडित नेहरू व खुद्द आंबेडकरांनी देखील असे हट्ट धरून चांगले प्रतिदावे मोडीत काढले होते. संविधान debates मध्ये याचे संदर्भ मिळतील. तरीदेखील काँग्रेसचे कौतुक यासाठी करावे लागेल कि प्रबळ विरोधी पक्ष नसताना देखील त्यांनी अतिशय सर्वसमावेशक व सर्व बाजू विचारात घेऊन अतिशय balanced अशी संविधान निर्मिती केली.

तेव्हा संविधान निर्माणात एकट्या आंबेडकरांचे योगदान हे बिलकुल नाही. सर्व संविधान सभा सदस्यांचे त्यात अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे व त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रामुख्याने साधारण ५० एक सदस्यांचे यात योगदान हे इतरांच्या तुलनेत अधिक आहे. त्यांची नवे आपल्याला खालील संदर्भांमध्ये सापडतील.

आपल्या कानावर येणाऱ्या गोष्टींची शहानिशा:

मग असे असताना आंबेडकर हे संविधानाचे जनक का?

याचे प्रमुख कारण हेच कि संविधान सभेतील सदस्यांपैकी आंबेडकरांइतका संविधान व कायद्याचा अभ्यास असलेले दुसरे कोणीच नव्हते, तसेच आंबेडकरांनी अनेक तांत्रिक बाबी व त्याचे संविधानात लेखी उल्लेख असणे का महत्वाचे आहे हे पटवून देऊन तसे अनेक लेखी उल्लेख व सुधारणा ह्या प्रत्यक्ष संविधानातच नमूद केल्या, त्यामुळे आपले संविधान हे अतिशय स्पष्ट बनले. आंबेडकर नसते तर कदाचित कितीतरी गोष्टीत संदिग्धता आली असती व कायदा व संविधान आत्ता आहे तितके सुस्पष्ट कदाचित झालेही नसते. तेव्हा आंबेडकरांचे योगदान हे अतिशय महत्वपूर्ण आहे यात शंका नाहीच. परंतु त्यांना एकट्याला सर्व श्रेय देणे हे बरोबर नाही.

मग इतर सदस्यांपैकी फक्त आंबेडकरांचे नाव पुढे का येते व त्यांचाच इतका उदोउदो का?

हि बाब काहींना अतिशय खटकेल व अनेक लोकं यावर कडाडून विरोध दर्शवतील, परंतु सत्य नेहमी कटू असते. आंबेडकरांचा उपयोग हा काँग्रेसला दलित लोकांना आपल्या जवळ करून स्वतःची राजकीय भाकरी आंबेडकरांचे नाव पुढे करून भाजून घ्यायची होती असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. यात तथ्य देखील आहे. पुढे हीच परंपरा दलित मते मिळावीत म्हणून इतर पक्षांनी पुढे चालू ठेवली. यात आंबेडकरांना देवत्व दिलं गेलंच, परंतु आंबेडकरांनी काँग्रेसमार्फत किती मोठं काम केलं आहे व हे करण्याची संधी कशी काँग्रेसने (गांधीजी व नेहरू) दिली. हे ओरडून ओरडून सांगण्याकरिता आंबेड्कर म्हणजे संविधान असे जणू समीकरणच बनवून टाकले.

तसेच काँग्रेसची हि राजकीय strategy होती कि एखाद्या नावाला मोठे बनवायचे व त्या नावे काँग्रेसचा प्रचार चालू ठेवायचा. काहीसं असाच आंबेडकरांच्या बाबतीत झालं. पुढे ह्याच पद्धतीला अनुसरून जसं,

"गांधींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले!"

"नेहरूंमुळे देशाची प्रगती झाली."

ह्याच धर्तीवर,"आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहिले." हे प्रचलित झाले.

पुढे सर्वच पक्षांनी याची री ओढली व संविधान आणि बाबासाहेबांचा वापर हा भावनिक मुद्द्यांकरिता, मतं मिळवण्यासाठी जास्त झाला. आजही तुम्हाला राजकीय नेते सोडले तर कोणतेही कायदेतज्ञ्, घटनातज्ञ हे कधीच असे म्हणताना दिसणार नाहीत कि बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिलं. (न्यूज चॅनेल वरील debates कृपया याकरिता पाहू नयेत.) "मी स्वतः काँग्रेस विरोधी नाही, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक अथवा विरोधक नाही! माझ्याकरिता गांधीजी, पंडित नेहरू व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व तितकेच आदरणीय आहेत, पण म्हणून मी गोष्टींकडे झुकते माप ठेऊन बघत नाही."

अनेक लोक यात विविध भाषणांचे संदर्भ देतात व आंबेडकरांनीच संविधान कसे लिहिले याचा पुरावा म्हणून ते स्वतःच ग्राह्य धरतात. यात टी टी कृष्णम्माचारी यांच्या भाषणाचा तर हमखास उल्लेख येतो. कोणीही दिलेलं भाषण हे कधीच कोणाच्या कामकाजाचे पुरावे होऊ शकत नाहीत. सरकारी दस्तावेजात त्याची नोंद हि एखाद्या गोष्टीच्या परिपूर्णतेची पावती असू शकत नाही.

तेव्हा फक्त बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिलेले नाही. यात अनेक लोकांचे योगदान तितकेच महत्वाचे व तोलामोलाचे आहे.

संदर्भ :

१) संविधान debates :

http://164.100.47.194/Loksabha/Debates/cadebadvsearch.aspx

२) संविधान series - राज्यसभा TV (हि अतिशय चांगली series आहे. यात १० भाग आहेत. परंतु सखोल अभ्यास जर कोणाला करायचा असेल तर हि series ग्राह्य धरू नये. संविधान debates मधेच संदर्भ मिळतील)

Samvidhaan - Episode 1/10

३) खाली comments मध्ये constituent assembly debates मधले दोन संदर्भ आहेत, तेही नक्की पहा. त्यात आंबेडकरांच्याच भाषणातील, बी एन रावांच्या कामाबद्दल उल्लेख असलेला एक संदर्भ कोणीतरी दिला आहे.

शिवाय संविधान सभेचे अध्यक्ष, डॉ राजेंद्र प्रसाद, यांच्या भाषणात देखील संविधान निर्मितीची व प्रक्रियेची summary आली आहे, तीदेखील खाली दिली आहे.

(हे इंग्रजीत आहे, म्हणून मूळ उत्तरात add केलेले नाही.)

👉काहींना बी एन रावांबद्दल काही शंका आहेत, काहींना process बद्दल ठोस संदर्भ हवा आहे. त्यांच्यासाठी हा पुन्हा separate copy करून संदर्भ देत आहे.

संविधान सभेचे अध्यक्ष, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या भाषणातील एक संदर्भ copy करत आहे. तारखेने आपण जरी शोधलंत तरी आपणास मिळेल.

CONSTITUENT ASSEMBLY OF INDIA DEBATES (PROCEEDINGS) - VOLUME XI

Saturday, the 26th November,1949

Mr. President: (डॉ. राजेंद्र प्रसाद)

The method which the Constituent Assembly adopted in connection with the Constitution was first to lay down its ‘terms of reference’ as it were in the form of an Objective Resolution which was moved by Pandit Jawaharlal Nehru in as inspiring speech and which constitutes now the Preamble to our Constitution. It then proceeded to appoint a number of committees to deal with different aspects of the Constitutional problem. Dr. Ambedkar mentioned the names of these Committees. Several of these had as their Chairman either Pandit Jawaharlal Nehru or Sardar Patel to whom thus goes the credit for the fundamentals of our Constitution. I have only to add that they all worked in a businesslike manner and produced reports which were considered by the Assembly and their recommendations were adopted as the basis on which the draft of the Constitution had to be prepared. This was done by Mr. B. N. Rau, who brought to bear on his task a detailed knowledge of Constitutions of other countries and an extensive knowledge of the conditions of this country as well as his own administrative experience. The Assembly then appointed the Drafting Committee which worked on the original draft prepared by Mr. B. N. Rau and produced the Draft Constitution which was considered by the Assembly at great length at the second reading stage. As Dr. Ambedkar pointedout, there were not less than 7,635 amendments of which 2,473 amendments were moved. I am mentioning this only to show that it was not only the Members of the Drafting Committee who were giving their close attention to the Constitution, but other Members were vigilant and scrutinizing the Draft in all its details. No wonder, that we had to consider not only each article in the Draft, but practically every sentence and sometimes, every word in every article. It may interest honourable members to know that the public were taking great interest in its proceedings and I have discovered that no less than 53,000visitors were admitted to the Visitors gallery during the period when the Constitution has been under consideration. In the result, the Draft Constitution has increased in size, and by the time it has been passed, it has come to have 395 articles and 8 schedules, instead of the 243 articles and 13 schedules of the original Draft of Mr. B. N. Rau. I do not attach much importance to the complaint which is sometimes made that it has become too bulky. If the provisions have been well thought out, the bulk need not disturb the equanimity of our mind.

👉आंबेडकर द्वेष? का हो, तुम्हाला खरंच असं वाटतं का, की आंबेडकरांबद्दल ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बोललं की आंबेडकर द्वेष, मनुस्मृती, जातीवादी असं काहीतरी बरळायला लागायचं म्हणजे काम फत्ते? जग एवढ्या ३-४ तत्वांवर चालत नाही. जरा झापडं उघडा लावलेली. नेते मंडळींची भाषणं जरा कमी ऐका. आपली भाषा बघून आणि आपला एकंदर कल बघून अजिबात उत्तर द्यायची इच्छा नव्हती, परंतु ठीक आहे. इतर कोणी आपल्यासारखेच असतील तर त्यांचीही जळमटे दूर होतील.

आपल्याला काय वाटतं? संविधान ६ चं लोकं लिहायला बसली काय? बर बसली तर त्यांची निवड कोणी केली? त्यांनी शून्यापासून सगळं लिहून चालू केलं का?

उत्तर नीट वाचलं तर घटनाक्रम लक्षात येईल.

सर्वात पहिले संविधान सभा स्थापन केली गेली. यात २९९ सदस्य होते. ६ नव्हेत. त्यांनी मग जे तज्ञ नेमले, (बेनेगल राव) त्यांनी एक draft तयार केला, जो पुढे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या ७ सदस्यीय समितीने आढाव्यासाठी घेतला व पुढचं काम केलं. हा draft पुढे संविधान सभेत सादर करून त्यात सुधारणा करण्याचं काम चालू राहीलं. इतकी साधी प्रक्रिया आहे. तुम्हाला ती झेपत नाही त्याला मी काय करणार? आंबेडकर द्वेष म्हणे.

ती सात सदस्यीय समिती ज्याचा तुम्ही वरती उल्लेख केला ती संविधान निर्मितीतील सर्वात महत्वपूर्ण घटक होती, त्यात आंबेडकरांचे योगदान इतरांच्या तुलनेत बरेच जास्त होते. असा स्पष्ट उल्लेख माझ्या उत्तरात आहे. परंतु संविधानात ही एकच समिती नव्हती, किंवा ही समिती म्हणजे संविधान सभा नाही.

हे केवळ draft constitution होते. ह्यात कितीतरी बदल झाले. उत्तर नीट वाचा आता परत एकदा. बहुदा प्रकाश पडेल. शिवाय comments मध्ये पण references दिले आहेत. कोणीतरी स्वतः आंबेडकरांच्याच भाषणाचा उल्लेख केला आहे. तो देखील वाचा. आणि आपण सुचवलेले पुस्तक मी जरूर वाचीन. तुम्ही देखील constituent assembly debates चाळा.

👉CONSTITUENT ASSEMBLY OF INDIA DEBATES (PROCEEDINGS) - VOLUME XI

Saturday, the 26th November,1949

Mr. President: (डॉ. राजेंद्र प्रसाद)

The method which the Constituent Assembly adopted in connection with the Constitution was first to lay down its ‘terms of reference’ as it were in the form of an Objective Resolution which was moved by Pandit Jawaharlal Nehru in as inspiring speech and which constitutes now the Preamble to our Constitution. It then proceeded to appoint a number of committees to deal with different aspects of the Constitutional problem. Dr. Ambedkar mentioned the names of these Committees. Several of these had as their Chairman either Pandit Jawaharlal Nehru or Sardar Patel to whom thus goes the credit for the fundamentals of our Constitution. I have only to add that they all worked in a businesslike manner and produced reports which were considered by the Assembly and their recommendations were adopted as the basis on which the draft of the Constitution had to be prepared. This was done by Mr. B. N. Rau, who brought to bear on his task a detailed knowledge of Constitutions of other countries and an extensive knowledge of the conditions of this country as well as his own administrative experience. The Assembly then appointed the Drafting Committee which worked on the original draft prepared by Mr. B. N. Rau and produced the Draft Constitution which was considered by the Assembly at great length at the second reading stage. As Dr. Ambedkar pointedout, there were not less than 7,635 amendments of which 2,473 amendments were moved. I am mentioning this only to show that it was not only the Members of the Drafting Committee who were giving their close attention to the Constitution, but other Members were vigilant and scrutinizing the Draft in all its details. No wonder, that we had to consider not only each article in the Draft, but practically every sentence and sometimes, every word in every article. It may interest honourable members to know that the public were taking great interest in its proceedings and I have discovered that no less than 53,000visitors were admitted to the Visitors gallery during the period when the Constitution has been under consideration. In the result, the Draft Constitution has increased in size, and by the time it has been passed, it has come to have 395 articles and 8 schedules, instead of the 243 articles and 13 schedules of the original Draft of Mr. B. N. Rau. I do not attach much importance to the complaint which is sometimes made that it has become too bulky. If the provisions have been well thought out, the bulk need not disturb the equanimity of our mind.

खास तुमच्यासाठी पुन्हा..

👉I was more than surprised when the Drafting Committee elected me to be its Chairman. There were in the Drafting Committee men bigger, better and more competent than myself such as my friend Sir Alladi Krishnaswami Ayyar. I am grateful to the Constituent Assembly and the Drafting Committee for reposing in me so much trust and confidence and to have chosen me as their instrument and given me this opportunity of serving the country. (Cheers.)

The credit that is given to me does not really belong to me. It belongs partly to Sir B. N. Rau, the Constitutional Adviser to the Constituent Assembly who prepared a rough draft of the Constitution for the consideration of the Drafting Committee. A part of the credit must go to the members of the Drafting Committee who, as I have said, have sat for 141 days and without whose ingenuity to devise new formulae and capacity to tolerate and to accommodate different points of view,the task of framing the Constitution could not have come to so successful a conclusion. (25th November 1949)

-खुद्द आंबेडकर

घ्या आणखीन एक संदर्भ..

खालीच Hiray Bansod यांनी comment केलेली त्यातूनच घेतलं. तुम्हालाही दिसलं असतं खरंतर. असो..

तुमचं आहे ना आंबेडकरांवर प्रेम, मग घ्या तुम्हालाही एक सल्ला. तुम्हाला द्वेषाचाच वाटेल हाही, परंतु मी तर प्रेमानेच देत आहे.

असेल ना प्रेम, तर आंबेडकरांची constituent assembly मधली भाषणं वाचा, संपूर्ण constitution वाचा. इतरांची त्यांच्याबद्दल भाषणं वाचा. आणि मग इथे असल्या फालतू comments करायला या.

👉संविधान कोणी लिहिलं नि कोणी नाही याची आज चर्चा करून काय साध्य होणार आहे?

हा केवळ बुद्धिभेद करण्याचा प्रकार आहे.

तुम्ही केवळ 'संविधान तज्ञ' होऊ पाहत आहात आणि घटनेच्या निर्मितीची नवी कहाणी रचू इच्छिता.

देशात आज रोजी असे अनेक मुद्दे आहेत की ज्यांनी मानवी जीवन नकारात्मकदृष्ट्या प्रभावित झाले आहे, त्या मुद्द्यांवर लिखाण करून सामान्य जनतेमध्ये जाणीवजागृती करावीशी नाही वाटली का?

'या' मुद्द्यावर लेखन करून नेमकं काय साध्य केलं हे जरा सांगा.

राहिलं भाषेचा प्रश्न तर त्याची सुरुवात तुम्ही केलीये.

आणि हो घटना तयार करण्यासाठी किती समित्या नि उपसमित्या तयार करण्यात आल्या होत्या, त्या सर्व समित्यांमध्ये किती लोक होते नि त्यांचे काय काम होते हे सर्व मला माहित आहे; कोणी किती काम केले हेही मला माहित आहे त्यामुळे संदर्भावर संदर्भ देऊन 'काहीतरी' भासवू नका.

रिप्लाय जरूर द्या.

👉अहो साहेब, ह्यात साध्य करायचा प्रश्नच नाही. मी इतरही काही उत्तरं quora वर लिहिली आहेत. प्रत्येक उत्तरातून ठराविक काहीतरी साध्य करायचं होतं असं नाही. संविधान कोण्या एका व्यक्तीने लिहिलं नाही. हे सांगितलं तर कुठे बिघडलं? तुम्हाला त्रास का होतोय तेच कळत नाहीए. आंबेडकरांबद्दल काही वाईट साईट लिहिलंय का मी? आंबेडकरांनी एकहाती संविधान लिहिलं असा जो समज आहे, तो दूर करण्यासाठीच लिहिलं. आणि ह्यात नवीन कहाणी रचण्याचा काही प्रश्नच नाही.

असो. तुम्ही ह्या भाषेत comment पाहिले केली असती, तर सभ्यपणे चर्चा झाली असती. विनाकारण त्याला वादवादीच स्वरूप आले.

असो, माझ्याकडून चर्चेस पूर्णविराम.

👉👍👍

हे debates सर्वच्या सर्व आज ऑनलाईन उपलब्ध आहेत।

श्रीराम।

👉१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधी किंवा काँग्रेसच्या मेहरबानीने संविधान सभेत नाही गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींची सहमती होती म्हणून संविधान सभेत आले, हा काँग्रेस पक्षाची आंबेडकरांवरील मेहरबानी दाखवाना खोटा व केविलवाना प्रयत्न आहे, ज्याला तुम्ही ही बळी पडलात. नेहरू, पटेल व सर्वच काँग्रेस नेते यांचा बासाहेबांना विरोध होता, त्यामुळे त्यांना मुंबईतून संविधान सभेत जाता आले नाही; म्हणून बाबासाहेब हे जोगेंद्र नाथ मंडल यांच्या मदतीने पश्चिम बंगाल मधून संविधान सभेत निवडून गेले (येथे काँग्रेसचा तगडा विरोध झाला होता, पण येथे बहुसंघ मुस्लिम होते).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातल्या सुमारे ६० संविधानांचा सखोल अभ्यास होतो. त्यावेळी जगात त्यांच्याइतके पारंगत कायदेतज्ज्ञ कोणीही नव्हता.

संविधान मसुदा

संविधान मसुदा हा एकट्या बी एन राव यांनी तयार केलेला नसून त्यात त्यात बाबासाहेबांचाच प्रमुख वाटा होता. आणि बाबासाहेबांनी बीएन राव यांना मसुदा निर्मितीचे श्रेय दिले होते. बीएन राव यांनी एकट्याने मसुदा तयार केला असे ते म्हणाले नाही.

संविधानाच्या विविध समितीत डॉ. आंबेडकर

संविधानाच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते हे निर्विवाद सत्य आहे. याशिवाय ते अन्य पाच समित्यांचेही सदस्य होते. एकदंर संपूर्ण संविधान निर्मितीत त्यांचे योगदान आहे. एकट्या आंबेडकरांचा ८०-९०% वाटा संविधान निर्मितीत आहे; त्यांना संविधानाचे शिल्पकार नाही म्हणायचे तर कुणाला म्हणायचे. पटेल, नेहरु, व राव हे हुशार नेते होते; पण बाबासाहेबांच्या प्रतिभेसमोर ते खूपच कमी होते.

👉Mahatma gandhinni nav "suchavle" tehi draft committee chya adhyakshapadasathi. Evdhach mhanla ahe. Arthatach samvidhan sabhet te swa-kartrutwawar nivdun ale. Ugach je mi lihila nahie, te krupaya mazya mathi maru naka.

Baki mudde mi pan mandlech ahet uttarat. Khali comment madhe articles cha count pan milel. Ani ho, samvidhan hi ektyachi nirmiti nahi asach suchwaych ahe. Mag ti kunachih nahi. Na B N Rau, na Do. Ambedkar.

Ani ho 80% 90% shreya kasa? hedekhil sangava.

👉परत चुकताय. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना बीजेपीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी यांनी मुख्यमंत्री केलेय. याला तुम्ही असं म्हणणार का की, कोश्यारींच्या कृपमुळे/मदतीमुळे ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले??

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कर्तृत्वामुळे निवडूनच आले नाही तर मसुदा समितीचे अध्यक्षही स्वतःच्या कर्तृत्वानेच झाले, यास फक्त गांधींनी साद दिली असावी. गांधी, नेहरुंसह, काँग्रेस व ब्रिटिशांसह सर्वांना आंबेडकरांची उच्च क्षमता माहिती होती.

👉Ambedkaeanchi kshamata navhti asa mi kuthech mhanla nahie. Ulat akhkhya congress madhe tech saglyat jast jankar hote asahi ullekh kelay.

Ani mahatma gandhinni nav suchavla he 100% satya ahe. Yacha arth asa nahi ki gandhijinchya krupene ale. Asa kuthehi mi mhanla nahi ani mazya manat dekhil asa kahi nahi

👉Dhananjay keer yanche dr.babasahebanche charitra granth vacha

👉 फारच मूलभूत प्रश्नाला हात घातलाय तुम्ही, या विषयावर एवढा अभ्यास केलात फारच छान मांडणी

👉कर्तृत्वाबद्दल आकस? बरं बुवा, तुम्ही म्हणाल तसं!

वरील ६ सदस्य असमर्थ होते असं म्हणलं नसून त्यांचं योगदान हे आंबेडकरांच्या तुलनेत बरंच कमी होतं असं मी म्हणलं आहे.

तसा स्पष्ट उल्लेख माझ्या उत्तरात आहे.

आपण जी माहिती सांगितली आहे ना, ती मुळात draft constitution बद्दल आहे. ती समिती संविधान निर्मितीत सर्वात महत्वपूर्ण समिती होती व त्यातही आंबेडकरांचे योगदान सगळ्यात जास्त होते असाही स्पष्ट उल्लेख माझ्या उत्तरात आहे.

परंतु draft constitution म्हणजे मूळ संविधान नाही. आणि शिवाय मूळ draft हा देखील आंबेडकरांनी लिहिला नाही. तुम्ही भावनिक मुद्द्यांवर का उत्तरं लिहिता quora वर मला समजत नाही. दाखवा ना मला खोटं ठरवून पुराव्यांच्या आधारे. "आनंदाने" मी माझी हार मान्य करिन. ज्ञानात भर पडणार असेल तर नक्कीच माझ्या खोटं ठरण्याचा मला आनंद होईल.

आणि आंबेडकरांना योग्य ते credit दिलेलच आहे. नीट वाचलं उत्तरं तर सापडेल.

👉अगदी बरोबर

👉Absolutely correct 👌👍

👉अप्रतिम उत्तर दिले सर , चंद्रामुळे चांदणीच्या प्रकाशास महत्व मिळत नाही तसे खरतर आंबेडकरांच्या कर्तृत्वापुढे इतर लोकांचे खारीचे का होईना असलेले कार्य झाकले जाते.

👉धन्यवाद शुभमजी! थोडक्या शब्दात अगदी योग्य मांडलत आपण.

👉बेनेगल नरसिंग राव (ICS उत्तीर्ण)

घटनेचा कच्चा मसुदा यांनीच तयार केला होता. त्यात 243 कलमे होती. त्यात दुरुस्ती करून 395 कलमे करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधिश

बेनेगल नरसिंगरावाचे बंधू सर्वाधिक काळासाठी RBI चे गव्हर्नर (1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957)होते. (बेनेगल रामाराव)

म्यानमारची घटनाही यांनीच बनवली.

(संदर्भ लोकसेवा पब्लिकेशन)

👉जबरदस्त, अभ्यासपूर्ण आणि सडतोड. आता भीमसैनिक रागावणारच!

👉नाही रागावणार अशी अशा करूयात. यात कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही खरं तर...

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

👉खुपच समर्पक व माहितीपूर्ण उत्तर. आपण हा लेख एखाद्या चांगल्या वृत्तपत्रात छापावा जेणेकरुन सर्वांना माहिती मिळेल. उत्कृष्ट लेखबद्दल आपले पुन्हा अभिनंदन.

👉खूप खूप धन्यवाद! नक्की प्रयत्न करीन.

👉१००%सहमत .बाबासाहेबांचा मोठा वाटा जरूर आहे.पण इतर लोकांचा सहभाग विसरता कमा नये

👉अतिशय परखड ते ही संदर्भासहीत उत्तर दिले आहे.

👉महोदय,

आपण जी मांडणी केली ती जर योग्य आहे असे समजून चालले तर

शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक का म्हणतात ?

सर्व लढाया त्यांनी एकट्याने लढल्या नसतील, पण तरीही आपण त्यांना स्वराज्य संस्थापक म्हणतो कारण लढाईचे ते प्रमुख होते तसेच संविधान समितीचे (जी असेल ती माझा तुमच्या एवढा अभ्यास नाही) प्रमुख होते म्हणून आपणच नाही तर स्वतः भारत सरकार सुद्धा त्यांना घटनेचे शिल्पकार मानते.

ही वरील विवेचन जर आपणास मान्य नसेल, तर तुम्ही असे समजता की स्वराज्य हे एकट्या राजांनी नाही , तर अनेकांनी लढून मिळवले व त्याचे श्रेय अनेकांना द्यावे लागेल

👉अहो आहेतच की. शिल्पकार / जनक आपण उपमा देऊ शकतोच. उलट ते जनक का? याचं पण विश्लेषण मी दिलं आहे. प्रश्न आहे संविधान "फक्त" आंबेडकरांनी लिहिले का.

आता तरीही आपल्या comment वर थोडं माझं मतप्रदर्शन. शिवाजी महाराजांची गोष्ट वेगळी आहे. त्यांनी स्वतः शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. संविधान ही संकल्पनाच मुळात वेगळी आहे. ते वादविवाद, दुरुस्त्या, इतिहास आणि त्यावरून निर्माण झालेले प्रश्न असं संमिश्र असतं. मुळात ही activity चं ग्रुप activity आहे.

आता साधं उदाहरण घ्या. दर वर्षी budget येतं, finance act येतं. आपण असं म्हणतो का की budget फक्त एकट्या निर्मला सीतारामन यांनी लिहिलं, किंवा अरुण जेटलींनी लिहिलं. एखादं सरकार budget आणतं, कायदे आणतं. त्याचप्रमाणे संविधान ही सर्व संविधान सभा सदस्यांची निर्मिती आहे. यात, कितीतरी लोकांचे भरघोस contribution आहे. मी तरी मोजकीच नावं दिली आहेत.

संविधान सभा ही संविधान निर्मितीची मुख्य सभा होती. (२९९ सदस्यांची) त्याचे तर अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेचे नेतृत्व पण त्यांनीच केले. मग त्यांना द्यायचं का श्रेय नेतृत्वामुळे? आंबेडकर हे draft committee चे chairman होते. Draft commitee मध्ये त्यांनी नेतृत्वही केले शिवाय सगळ्यात जास्त contribution देखील त्यांचे होते. पण त्या draft वर पुढे सभेत बरंच काम झालं. मूळ draft बी न रावांनी लिहिला. सुरुवातीचं दिशादर्शक भाषण पंडित नेहरूंनी केलं. मग नक्की कोणाला श्रेय द्यायचं? तेव्हा सगळ्यांनाच श्रेय द्यायला हवं असं माझं म्हणणं आहे.

👉अप्रतिम उत्तर

👉साने सर ,

खूप अभ्यासपूर्ण असे वास्तविक उत्तर अतिशय निर्भीड वृत्ती जपत दिले आपण ….इतिहास हा सत्यावर आधारित असावा , त्यात राजकीय कपटवृत्ती ,चलाखी ची सरभेसळ नको हाही संदेश आपल्या लेखातून मिळतो …

👍👍👍👍👍

👉स्वतः डॉ. आंबेडकरांनीच या बाबतीत नम्रतेने स्वीकार केलेले आहे की घटना ही घटना समितीची निर्मिती आहे ..

I was more than surprised when the Drafting Committee elected me to be its Chairman. There were in the Drafting Committee men bigger, better and more competent than myself such as my friend Sir Alladi Krishnaswami Ayyar. I am grateful to the Constituent Assembly and the Drafting Committee for reposing in me so much trust and confidence and to have chosen me as their instrument and given me this opportunity of serving the country. (Cheers.)

The credit that is given to me does not really belong to me. It belongs partly to Sir B. N. Rau, the Constitutional Adviser to the Constituent Assembly who prepared a rough draft of the Constitution for the consideration of the Drafting Committee. A part of the credit must go to the members of the Drafting Committee who, as I have said, have sat for 141 days and without whose ingenuity to devise new formulae and capacity to tolerate and to accommodate different points of view,the task of framing the Constitution could not have come to so successful a conclusion. (25th November 1949)

परंतू भारतात एक परंपरा प्रस्थापित झाली आहे की कोणत्याही कार्यासाठी एकाच व्यक्तीला श्रेय देण्याची. जसे की

मोदींनी नोटाबंदी केली ! (मोदी म्हणजे संपूर्ण भारत सरकार काय?)

मोदींनी पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केला! ( जणू काही एकट्या मोदींनी निर्णय घेतला आणि स्वतःच फाईटर विमानात बसून पाकिस्थान व्याप्त प्रदेशात जाऊन स्ट्राईक करुन आलेत )

इंदिरा गांधींनी पाकिस्तान चे दोन तुकडे केलेत ! ( पुन्हा तेच )

श्री रामाने रावनाचा पराभव केला ! (मग लक्ष्मण, हनुमान, वानरसेना, विभिषण इत्यादींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती का ?)

शहाजहान ने ताजमहाल बांधला! (मग शिल्पकार, कामगार वैगरे एकटा शहाजहानच होता का ? )

युद्ध जरी सेना आणि सेनापती जिंकत असले तरी नाव मात्र राजाचेच होते.

👉अगदी बरोबर!

आपली टिपण्णी लपवली गेल्याने (का ते माहीत नाही) हा संदर्भ आत्ता दृष्टीस पडला. सर्वात relevant संदर्भ आहे यात.

तसंच बाकीही मुद्दे अतिशय योग्य!

👉मी बौद्ध आहे पण पहिल्यांदा भारतीय आहे आणि आंबेडकरांबाबत आदर तेवढाच ……. बाबासाहेबानी सांगून ठेवलं आपलीच माणसं जेव्हा धोका देतात ते कस …. आणि त्यांनी कधीच कुठलंही श्रेय घेतलं नाहीच हे कधी कडेल पण यावर प्रकाश म्हणून स्टार प्रवाह …वरील मालिका मोलाची साथ होऊ करतेय त्यांच्या टीमची रिसर्च अफाट अशी दिसली या मालिकेला पाहून …..थोडा फार उच् बीच असतो त्याला

👉माफ करा, आपल्याला काय म्हणायचंय ते मला नीटसं कळालं नाही. परंतु बाबासाहेबांच्या धर्माचा / त्यांच्या जातीचा, या उत्तराशी खरच काही संबंध नाही. मी अश्या विषयांचा अभ्यास करत देखील नाही. मलाही बाबसाहेबांबद्दल आदर आहे व मी तसं स्पष्ट लिहिलं देखील आहे. तो नसायचं काही कारणच नाही. तसेच या उत्तरातून कोणाला धोका द्यायचा प्रश्नच नाही. हे वास्तव आहे. आपण खालील संदर्भात थोडी जरी शोधाशोध केलीत तरी लगेच या गोष्टी सापडतील.

तसेच हे उत्तर लिहायला कोणाला फार research करायची गरजच नाही. ह्या अतिशय मूलभूत गोष्टी आहेत. अगदी वर वरचं ज्ञान ज्यांना आहे तेदेखील ह्या गोष्टी मान्य करतील. आपण संविधान ही राज्यसभेची tv series जरूर पहा. ती youtube वर मोफत उपलब्ध आहे.

👉मला वाटतं तुमचा कायतरी गोंधळ झालेला आहे….सुरवातीला तुम्ही म्हणता एकटा संविधान लीहुच शकत नाही म्हणून आंबेडकरांनी एकट्याने संविधान लिहिले नाही… अनेक कायदे आहे वगैरे…आणि परत काही वाक्य लिहिल्यावर म्हणता संविधान हे एकट्या बी एन राव यांनी लिहिले… आणि तपासण्यासाठी 7 जणांची समिती नेमली… तर अस नवे भाऊ….

संविधान सभेचे निर्मिती होताना आंबेडकर हे मुंबईमधून हरलेले होते म्हणून त्यांना बंगला प्रांतातून म्हणजेच सध्याछा बांगलादेश येथून निवडले गेले….आता त्यावेळचा राष्ट्रीय सभेला संविधानाची निर्मितीसाठी आंबेडकरांची गरज काय….तर माउंटबॅटन यांना सर्वसमावेशक संविधानाची गरज होती..आणि ते सर्वसमावेशक संविधान फक्त आंबेडकर लिहू शकतात…कारण संविधान लिहिण्याचा प्रयत्न या अगोदर देखील झाला होता…भारत सर्वसमावेशक संविधान लिहू शकत नाही अशी टीका 1935 सली भरात्मंत्री Barkanhed केलं त्यावेळी मोतीलाल नेहरू यांनी संविधान लिहिण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही…हे ओळखून सर्वसमावेशक संविधान लिहिण्यासाठी आंबेडकरांची निवड केली…नाहीतर त्यावेळी एका अस्पृश्य माणसाचा स्पर्श विटाळ होता……मग या अस्पृश् माणसाला संविधान सभेत तरी स्थान मिळालं असत का?नाही ना.… लिहायला लोकांनी दिले असते का? उत्तर येणार नाहीच….तरी पण निवड झाली…ती तपासण्यासाठी नाही तर संविधान लिहिण्याची गरज होती म्हणून…आणि म्हणून मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले गेले भारतरत्न आंबेडकर…आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किती योगदान दिले ते आपण मांडलाच आहात.. आणि बी एन रवांच जर म्हटलं तर संविधान निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे हे आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतील भाषणात मान्यच केलेलं आहे…परंतु त्यांचं कार्य संविधानातील एखाद कलम कायद्याला अनुसरून आहे की नाही हे तपासण्याचे होते.बी एन राव हे मसुदा समितीचे कायदेविषयक सल्लागार होते.त्यामुळे तुम्ही काहीही म्हणा संविधानाची शिल्पकार फक्त विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरच….

आणि त्यांनी संविधान लिहिलं म्हणून जशास तास स्वीकारलं नाही…प्रत्येक कलामावर चर्चा झाली…सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला समर्पक उत्तरे साहेबांनी दिलेली आहेत ….सर्वांचे शंका निरसन झाल्यावर ते स्वीकारलं गेलं २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी..पण अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून…मग २६ जानेवारी का निवडला?

स्वातंत्र्यपूर्व काळात २६ जानेवारी १९३० या दिवशी लाहोर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती.आणि त्या दिवशी स्वातंत्र्य प्राप्त झाले असे सर्वांनी वागावे असे आवाहन महात्मा गांधीजी यांनी केले होते..म्हणून संविधानाची amalbajavani २६ जानेवारी या दिवसापासून केली…

👉एकट्या माणसाने संविधान लिहिलेलं नाही एवढाच इथे मुद्दा आहे आणि प्रश्न पण तेव्हडाच आहे. उगाच इतर गोष्टी इथे देण्याचा तस फारसा काही संबंध नाही असं मला वाटतं. आंबेडकरांनी संविधान लिहिलं असं आजकाल म्हणतात कारण ते "draft constitution" तयार करण्याच्या समितीचे अध्यक्ष होते. मी आधीच लिहिलं आहे कि संविधाननिर्मितीचं श्रेय हे कोणाला एकट्या व्यक्तीला देता येणार नाही. तरीही कोणाचा अट्टाहास पुरवायचा म्हणून एकट्या व्यक्तीला श्रेय द्यायचं असेल, तर ते बी. न. रावांना द्यावं कारण मूळ मसुदा त्यांनी "लिहीला" होता. अर्थात हेही चुकीचंच आहे असंच यातून सुचवायचं आहे.

तरीही बर झालं आपण comment केलीत, खाली आपल्यासाठी संदर्भ जोडत आहे. बाकी आपणच ठरवा काय बरोबर, काय चूक.

CONSTITUENT ASSEMBLY OF INDIA DEBATES (PROCEEDINGS) - VOLUME XI

Saturday, the 26th November,1949

Mr. President: (डॉ. राजेंद्र प्रसाद)

The method which the Constituent Assembly adopted in connection with the Constitution was first to lay down its ‘terms of reference’ as it were in the form of an Objective Resolution which was moved by Pandit Jawaharlal Nehru in as inspiring speech and which constitutes now the Preamble to our Constitution. It then proceeded to appoint a number of committees to deal with different aspects of the Constitutional problem. Dr. Ambedkar mentioned the names of these Committees. Several of these had as their Chairman either Pandit Jawaharlal Nehru or Sardar Patel to whom thus goes the credit for the fundamentals of our Constitution. I have only to add that they all worked in a businesslike manner and produced reports which were considered by the Assembly and their recommendations were adopted as the basis on which the draft of the Constitution had to be prepared. This was done by Mr. B. N. Rau, who brought to bear on his task a detailed knowledge of Constitutions of other countries and an extensive knowledge of the conditions of this country as well as his own administrative experience. The Assembly then appointed the Drafting Committee which worked on the original draft prepared by Mr. B. N. Rau and produced the Draft Constitution which was considered by the Assembly at great length at the second reading stage. As Dr. Ambedkar pointedout, there were not less than 7,635 amendments of which 2,473 amendments were moved. I am mentioning this only to show that it was not only the Members of the Drafting Committee who were giving their close attention to the Constitution, but other Members were vigilant and scrutinizing the Draft in all its details. No wonder, that we had to consider not only each article in the Draft, but practically every sentence and sometimes, every word in every article. It may interest honourable members to know that the public were taking great interest in its proceedings and I have discovered that no less than 53,000visitors were admitted to the Visitors gallery during the period when the Constitution has been under consideration. In the result, the Draft Constitution has increased in size, and by the time it has been passed, it has come to have 395 articles and 8 schedules, instead of the 243 articles and 13 schedules of the original Draft of Mr. B. N. Rau. I do not attach much importance to the complaint which is sometimes made that it has become too bulky. If the provisions have been well thought out, the bulk need not disturb the equanimity of our mind.

👉असाच एखादा पुरावा आणि ७० वर्षानंतर मांडला जाईल आणि आंबेडकर यांचा संविधनाशी काहीच संबंध नाही अशी लोक मत मांडतील किंवा एखाद पुस्तक लिहितील कुणाचा तरी नावाचा रेफरन्स देऊन….इतिहास लिहावा ऐतिहासिक साधनावरून पण ती ऐतिहासिक साधनांची पडताळणी करणे महत्वाचचे आहे…

आणि काँगेस ने जर त्यांचा वापर केला असेल तर देशातील इतर पक्ष काय झोपले होते…का रा.स्व.संघ झोपला होता…कुणीच का त्यावेळी आवाज उठावाला नाही…का सगळ्यांनाच आंबेडकरांच्या नावाचा फायदा घ्यायचा होता….ambedkarana त्यावेळेपासून भारताच्या sanvidhanache जनक,शिल्पकार म्हणतात त्यावेळी कुणीच का विरोध केला नाही…आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने 6 दिवस इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये संविधान लिहिले अस का म्हणतात १९४९ पासून जर त्यांनी लिहिलं नसेल तर….

मला एक उत्तर द्या जर बी एन राव यांनी जर मसुदा लिहिलं असतं तर संविधान सभेत सदस्यांच्य प्रश्नांची उत्तरे आंबेडकरांनी का दिली…बी एन राव यांनी का दिली नाही?ज्यांनी कलम लिहिली असतील त्यांनाच ती तरतूद का केली याच उत्तर माहीत असेल दुसऱ्या व्यक्तीला कसं माहीत असणार ना…मग प्रश्न निर्माण होतो ambedkarana हे सर्व डिटेल कसं माहीत असणार…बी एन. राव यांनी कलम लिहिलीत म्हणे त्यांनाच ते माहीत असायला हवं..बी एन राव यांनी ती उत्तर द्यायला पाहिजे होती…

ज्याप्रमाणे मसुदा समिती होती त्याप्रमाणे ध्वज समिती होती…त्यांना भारताचा ध्वज कसं असावा यासाठी संविधान सभेला सूचना करायची होती…अशावेळी त्या समितीतील सदस्यांनी तिरंगा dhwajachi संकल्पना मांडली ..तो तयार केला एका शिंपी व्यक्तीने म्हणजे तो शिंपी ध्वजाचा जनक होत नाही…याच सर्व श्रेय जात त्या समितीतील लोकांना…

आणि इतर जी माहिती मी माझा उत्तरात लिहिली ती तुमच्यासाठी नसून माझा वाचकांना संपूर्ण माहिती व्हावी यासाठी आहे….धन्यवाद

👉साहेब, आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, संविधानासंदर्भात सर्वात अधिकृत कोणता पुरावा असेल ना, तर तो संविधान debates किंवा constituent assembly debates चा धरला जातो. तेव्हा उगाच कोणीतरी ७० वर्षांनंतर काहीतरी म्हणेल वगरे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही.

दुसरी गोष्ट, मसुदा समितीच कामच होतं, की बी न रावांच्या मसुद्यात दुरुस्त्या व बदल करण्याचं त्यामुळे नंतर त्या समितीच्याच सुधारित संविधानावर आणखीन पुढचं काम संविधान सभेत चालू झालं. procedure समजून घेतली की अश्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. आणि तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर constituent assembly debates ची लिंक दिलीच आहे. त्यातील प्रत्येक तपशिलात जाऊन "Rau" असे search करा. तुम्हाला सर्व माहिती व उल्लेख व घटनाक्रम सापडतील.

असो, आपणाशी आता मी या विषयावर अधिक वाद घालू इच्छित नाही. constituent assembly debates चा पुरावाच ग्राह्य धरण्याजोगा आपणास वाटत नसेल तर अधिक वाद विवाद करून देखील काही साध्य होईल असे वाटत नाही. तेव्हा माझ्याकडून चर्चेस पूर्णविराम.

👉ते सगळं ठीक आहे पण हे "विश्वरत्न" म्हणजे काय??

👉मुद्दा तो नाही तरी पण तुला माहित करून घ्याचेच असेल तर तुझा फोन नंबर दे मग मी सांगेन तुला विश्व रत्न काय तर !

👉तुला बहुतेक माझी टिप्पणी कळली नाही..

👉Rhushikesh Jadhav ,tujha udhhar sudha Babasaheb Ambedkar yanchyamulech jalal he visarala kay?Ya manuvadyani sanvidhan lihile aste tar tumhala konatehi reservation milale nasate. Sane yana khup aakas disanto Babasahebanvishayi.Tumhi kitihi aag okali tari satya lapanar nahi.

👉मला माहित बाबासाहेबांबद्दल कदाचित तुझ्यापेक्षा जास्त; विश्वरत्न, मूळनिवासी असली चिल्लर काम करून तुम्ही लोकं त्यांचाच मजाक उडवत आहात.

👉dr ambedkarani sanvidhan ektyane lihile nahi he jar ka khare ahe tr mg jevha sanvidhana madhe chuka kadhlya jatat tevha fakt ambedkarana ch ka dosh dila jato..

👉मूर्खपणा आहे असं करणं म्हणजे. आणि संविधानात "चुका" अस खरं तर म्हणता येणार नाही. काही गोष्टींचा इतिहासाच्या आधारे वादविवाद होतो, तर काही गोष्टीत काळानुसार बदल / ammendments व्हायला हव्यात म्हणून वादविवाद होतो. हे वादविवाद जरूर झाले पाहिजेत. परंतू संविधानात "चुका" झाल्या व त्या आंबेडकरांमुळेच असं कोण म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही.

👉#Archana shinde# संविधानावर देखील बरेच टीकात्मक ग्रंथ आहेत जे की लिहले आहेत पण ते देखील संविधानाच्याच कामी येतात त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान लिखाणावर किंवा त्यांच्या महत्वपूर्ण योगदानावर नितेश साने सारख्या लेखकांकडून टीका टिप्पणी होत असेल तरी देखील त्या गोष्टीचा तिळमात्र ही फरक पडणार नाही.

👉Background logic is good. But all final committee members ,except Dr. Ambedkar , did not work in the constitution committee work, like one went to foreign, one cited resin of ill health etc. So ultimately it's only Dr. Ambedkar prepared the constitution. This is being told to me. What's is true?

Secondly, there is always Leader has to be there. By your logic, we should not give credit to Lokmanya Tilak off Asontashache Janak , as it's people who were against the British, we should not give credit to Netaji Bose, as it's his soldier who fought, we should not call Gandhi as Father of nation as many tall leader and other people fought for Independence and Satyagrah,

Post independence, we should not give credit to Mrs. Gandhi for making separte Bangladesh as its military who fought,

Recently we should not give credit to PM Modi for for surgical strike as its done by military not by PM Modi.

All this argument is being told to me by followers of Dr. Ambedkar

.

Are these logic false ?

👉Regarding lawyers , I tell you most of them have not studied the constitution debates, they only study constitution. So naturally, they will not credit the Dr. Ambedkar.

Secondly, 99 . 99 percent lawyers have not studied even our independence movement. So your logic is totally wrong.

Thirsty Supreme Court judges Like Hon'ble judge Dhananjay Chandrachud ,has given credit to Dr. Ambedkar , a lot. Many constitutional expert have given credit to Dr. Ambedkar .

What do you say ? Why they gave credit ?

👉खूपच छान साने सर.. आज खूप मोठी माहिती भेटली आणि ज्ञानात थोडीशी भर ही पडली.. तुम्ही जे सांगितलं हे भरपूर लोकांना हे माहिती आहे पण काही विशिष्ट लोक सत्य सांगितलं की भिऊन खालच्या थराला जाऊन भाषा करतात.. म्हणून सुसंस्कृत घरातील लोक ह्यावर बोलणे टाळतात..पण सत्य हे बोललच पाहिजे.. तुम्ही ते योग्य आणि मुद्देसूद पध्दतीने मांडले त्याबद्दल आभार

👉*घटना एकट्या आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !"*

✊�✊�✊�✊�✊�

👀👀👀

*डॉ बाबासाहेब आंबेडकर* हे संविधानाचे शिल्पकार नव्हेत असा जावई शोध लावणाऱ्या मूर्ख लोकांना कळत नाही, संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . *मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते.*

मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटणा एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडतात. असा बुद्धिभेद करणे हे अतिशय संतापजनक आहे.

सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही.

"...भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन ...,

"बाबासाहेब हे भारतीय व

घटनेचे शिल्पकार नव्हतेच !" असे सांगून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे , घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत ....

*पुरावा क्र. १*

👀👀

मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ. आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."

*पुरावा क्र. २*

👀👀👀

घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."

*पुरावा क्र. ३*

👀👀👀

घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."

डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा... BBC

*(संदर्भ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ,पृष्ठ क्र.१०,प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन).*

🙏

तसेच बाबासाहेबांकडे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी मुलभूत जबाबदारी होती त्या व्यतिरिक्त त्यांना घटना समितीच्याच 9 समित्यांवर सभासद म्हणून नेमले होते.

त्या समित्या अशा:

(1) संविधान निर्माण समिती

(2) ध्वज समिती

(3) मुलभूत अधिकार समिती

(4) मताधिकार समिती

(5) संविधान समिती

(6) अल्पसंख्यक समिती

(7) सल्लागार समिती

(8) नागरिकत्व विशेषाधिकार समिती

*(9) सर्वोच्च न्यायालय विशेषाधिकार समिती मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर*

सदस्य:

(1) अल्लादी क्रूष्णस्वामी अय्यर

(2) के.एम.मुन्शी

(3) गोपाल अय्यंगार

(4) एन.माधवराम

(5) मोहम्मद सादूल्ला

(6) डी.सी.खेतान

🙏🙏🙏

👉👉भारतीय राज्यघटना – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या vision चं दिमाखदार product.

२६ जानेवारी १९५० पासून आपली राज्यघटना देशभरात अमलात आली. तेव्हापासून आज पर्यंत – ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. इतक्या जाती-धर्मानी युक्त असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही, कुठल्याही यादवीशिवाय प्रगतीपथावर आहे, ह्याचं श्रेय आपल्या राज्यघटनेलाच. पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.

Quora वर देखील हा प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नावर दोन वेगवेगळी उत्तरं दिली गेली – आणि ही दोन्ही उत्तरं केवळ awesome आहेत.

पाहिलं उत्तर आहे *तेजस्विता आपटे हिचं ती म्हणते :*

===

*ह्या अश्या प्रश्नांनाच मी “अपमानास्पद” समजते.*

*तुम्हाला काय वाटतं–घटना निर्माण करणारे – जे देशातील सर्वात हुशार व्यक्ती होते – एवढे मूर्ख असतील का की इतर देशाची घटना जशीच्या तशी कॉपी करतील?*

*तुम्हाला काय वाटतं – आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) – टिकला आहे, प्रगती करतोय – ते एका “कॉपी” केलेल्या राज्यघटनेच्या बळावर?*

*तुम्हाला खरंच असं वाटतं का ❓की जगातील सर्वात मोठी लोकशाही, इतर देशांच्या घटनेला कॉपी करून बनवलेल्या घटनेच्या बळावर अशीच एका तुक्क्यामुळे व्यवस्थीत कार्यान्वित आहे?*

*समजून घ्या – सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झालं.*

*प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी modify केली गेली, त्यानुसारच accept केली गेली.कुठलाही अभ्यास केल्याशिवाय “असे” आरोप करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.*

*थोडीशी कल्पना हवी असेल तर एक fact सांगते – आपली राज्यघटना ६६ वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. आणि जगभरातील राज्यघटनांचं सरासरी वय आहे – १७ वर्ष ! ह्यावरूनच हे कळेल की राज्यघटना लोकांसाठी suitable नसेल तर काय होतं.*

===

*सणसणीत !*

*पुढे, अनुप कुंभारीकरने अगदी वेगळ्याप्रकारे उत्तर दिलंय :*

===

चाकाचा शोध पुनःपुन्हा नं लावणे (म्हणजेच, आधी जे चांगलं चांगलं शोधल्या गेलंय, ते कुठलाही आडपडदा नं ठेवता वापरणे) हे हुशार लोकांचं लक्षण आहे.

होय – भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांच्या मदतीने/आधारानेच बनवली गेली आहे. पण ह्याचा अर्थ जर “भारतीय राज्यघटना ही कॉपी केलेली आहे” असा काढल्या जात असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.

ह्यावर मी काय बोलू? स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आरोपाचं awesome उत्तर दिलं आहे : “It is said that there is nothing new in the Draft Constitution, that about half of it has been copied from the Govt. of India Act of 1935 and that the rest of it has been borrowed from the Constitutions of other countries. Very little of it can claim originality.

One likes to ask whether there can be anything new in a Constitution framed at this hour in the history of the world. More than hundred years have rolled over when the first written Constitution was drafted. It has been followed by many countries reducing their Constitutions to writing. What the scope of a Constitution should be has long been settled. Similarly what are the fundamentals of a Constitution are recognized all over the world. Given these facts, all Constitutions in their main provisions must look similar. The only new things, if there can be any, in a Constitution framed so late in the day are the variations made to remove the faults and to accommodate it to the needs of the country. The charge of producing a blind copy of the Constitutions of other countries is based, I am sure, on an inadequate study of the Constitution…

As to the accusation that the Draft Constitution has produced a good part of the provisions of the Govt. of India Act, 1935, I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds any patent rights in the fundamental ideas of a Constitution…provisions taken from the Government of India Act, 1935, relate mostly to the details of administration. 4th Nov 1948, Constituent Assembly

घटनाकार आंबेडकर इथेच थांबले नाहीत ! ते ह्याही पुढे गेले आहेत आणि त्यांनी “एक संपूर्ण नवी राज्यघटना देशासाठी जास्त चांगली असली असती का?” ह्याही प्रश्नाचं दमदार उत्तर दिलंय : “I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.” मी पुढे हे म्हणेन – कुठल्याही देशाला, स्वतःची राज्यघटना implement करण्याची संधी क्वचितच मिळते. जर ह्या संधीचं सोनं केलं नाही तर पुढे रक्तपात होतो. आपल्या देशात अहिंसक मार्गाने राज्यघटना अमलातही आली आणि अनेकांना रक्तपाताशिवाय समानतेची हमी मिळाली.

आपल्याला “great” राज्यघटना मिळाली आहे.

===

बास…! बोलती बंद…!

👉जातीवाद?

मुळात problem हा आहे ना, कि तुम्ही वास्तवाच्या आधी जात बघता म्हणून तुम्हाला डोळ्यासमोरच्या गोष्टी दिसत नाहीत. तुमचं चालू असू द्यात.

आहेच कि माझं ज्ञान अर्धवट. माझी थोडीच संविधानाबद्दल पारायण झाली आहेत. तुमच्याकडे ते अर्धवट ज्ञान पूर्ण होण्याजोगं असेल तर तेव्हडंच सांगा.

♨️#भारतीय_राज्यघटनेचे_लेखक..?

डॉ,#बाबासाहेब की #प्रेमबिहारी नारायण रायजादा..?

जेव्हा भारतीय राज्यघटनेचे नाव येते तेव्हा प्रत्येक भारतीयांच्या मनात गर्विष्ठ होते. तथापि, आपली भारतीय घटना जगातील सर्वात मोठी हस्तलिखित घटना आहे. घटनेचा अर्थ असा आहे की कोणत्याही देशाला योग्य प्रकारे चालण्यासाठी घटनेची आवश्यकता असते. हे लोकांना नियमांच्या कक्षेत काम करण्याचे स्वातंत्र्य देते. आम्ही आमच्या भारतीय घटनेबद्दल बोलत आहोत ज्यांना पूर्ण तयार होण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. आता पर्यत सर्वात मोठी लिहिलेली हस्तलिखित घटना...!

ती कोणी लिहिली.? तर अशी सुरुवात झाली :-

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विषयांचे लिहिणारे बिहार राज्यातील मूळ रहिवासी आणि दोन्ही हातांनी दोन्ही पेनने. आयसीएस डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ. भीमराव आंबेडकर, मुळचे महाराष्ट्र चे रहिवासी, व भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेचे मसुदाकार डॉ. व्ही.एन. राय (बेनेगल नरसिंह राव, जन्मस्थळ - मंगलोर हे हेग आंतरराष्ट्रीय कोर्टाचे स्थायी न्यायाधीश आणि भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारीही होते. ते भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार होते.) भारतीय संविधान डॉ. व्ही.एन. चा मसुदा मिळविण्यासाठी जवाहरलाल नेहरू जबाबदार होते. तो डॉ.व्ही.एन राय यांच्याकडे सादर केला होता.. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर राय यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना तयार केली. अमेरिकन राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ज्याप्रमाणे "आम्ही अमेरिकेचे लोक आहोत" अशी नोंद आहे, त्याचप्रमाणे डॉ.व्ही.एन. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत राय यांनी “आम्ही भारताचे लोक” ऐवजी “आम्ही भारताचे नागरिक” अशी नोंद केली. या कामासाठी जवाहरलाल नेहरू यांनी डॉ.व्ही.एन. राय यांना २५००० रुपये दिले. उत्तर प्रदेशचे मूळ रहिवासी सुलेखक श्री. प्रेम्बिहारी नारायण रायजादा भारतीय राज्यघटनेचे लेखक होते. त्यांचा जन्म १७ डिसेंबर, १९०१ रोजी कॅलिग्राफिस्ट कायस्थ जाती कुटुंबात झाला. त्याचे आईवडील बालपणातच मरण पावले. त्यांचे आजोबा मास्टर राम, श्री रामप्रसाद रायजादा यांनी दिल्लीत वाढविले. श्री रामप्रसाद रायजादा यांना "कॅथी" म्हणजेच कैथीली म्हणजेच कायस्थी म्हणजेच कोर्टरूम भाषा आणि त्यांची सुलेखन इटालियन शैली आणि पर्शियन, इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये स्वीकारण्यात आलेली पूर्वलेखित आणि पूर्वीची पुरातन भारतीय परंपरेची जाण होती. त्यांच्या आजोबा मास्टर साहेबांकडूनच श्री. प्रेम्बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांची कायस्ती म्हणजेच फॉरेन्सिक भाषा तसेच कॅलिग्राफी आणि पर्शियन, इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकल्या आणि त्यांचे शिक्षण सेंट स्टीफन कॉलेजमधून घेतले.

जवाहरलाल नेहरूंनी भारतीय संविधान लिहिण्याची जबाबदारी श्री प्रेम्बिहारी नारायण रायजादा यांच्यावर सोपविली. जवाहरलाल नेहरूंनी श्री प्रेमबिहारी नारायण रायजादा यांना विचारले होते की भारतीय राज्यघटना लिहिताना तुम्ही काय घ्याल? श्री. प्रेमबिहारी नारायण रायजादा म्हणाले की, मला भारतीय संविधान लिहिण्याच्या रूपात पैशांची गरज नाही. माझ्याकडे माझ्या सर्व परमपिता परमात्माने प्रदान केलेले सर्व काही आहे. मला असं खूप पाहिजे आहे की माझ्या लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर, माझे नाव आणि शेवटच्या पानावर, माझे आणि माझे आजोबा श्री रामप्रसाद रायजादा यांचे नाव. जवाहरलाल नेहरूंनी श्री प्रेम्बिहारी नारायण रायजादाची ही अट मान्य केली.

भारतीय संविधान लिहिण्यासाठी पुण्यात हस्तनिर्मित कागद तयार केला गेला. त्यावेळी भारतात टाइपरायटिंग मशीन नव्हती. त्यावेळेस भारताचे सर्वोच्च विद्वान आणि स्वत: चे मतप्रवाह असलेले सुलेखनकार श्री प्रेमबिहारी नारायण रायजादा वगळता इतर कोणीही नव्हते. श्री प्रेम्बिहारी नारायण रायजादा यांनी ३०३ कलमधारक पेन आणि २५४ शाई डबे वापरुन भारतीय राज्यघटना हिंदी व इंग्रजी भाषेत लिहिली आणि ६ महिन्यात लेखनाचे काम पूर्ण केले. भारतीय #संविधानाच्या 'मूळ' च्या प्रत्येक पृष्ठावर त्याच्या कॉपीराइट अंतर्गत असलेले त्यांचे #नाव आणि शेवटच्या पानावर असलेले त्यांचे आजोबा यांचे नाव आणि त्यांचे चिन्ह अद्याप अस्तित्त्वात आहेत.

(प्रेम नाव दिलंय प्रत्येक पेजवर)

जगातील सर्वात मोठ्या भारतीय घटनेत हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ३९५ अनुच्छेद, २२ भाग आणि ८ अनुसूचिया आहेत. श्री प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेत कोणतीही चूक नाही. तेथे एक विसंगती चिन्ह नाही. प्रभावी शैलीने लिहिलेले. कॅलिग्राफी हे उत्कृष्टतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शांतीनिकेतन कलकत्ता आणि पश्‍चिम बंगालमधील रहिवासी विद्वान श्री #नंदलाल बोस यांनी भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक पान उच्च प्रतीच्या सोनेरी सजविले आहे. भारतीय घटनेच्या सर्व पानावर भारतीय इतिहासाचे विविध अनुभव आणि व्यक्तिरेखा चित्रित केल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावना पान श्री नंदलाल बोस यांचे शिष्य श्री राम मनोहर सिन्हा यांनी सजवले आहेत. या भारतीय घटनेची २११ पृष्ठे आहेत. या भारतीय घटनेची लांबी २२ इंच आणि रुंदी १६ इंच आहे. भारतीय राज्यघटनेची कागदी घटना झाली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीचे वजन ३.७५ किलो आहे.. भारतीय संविधान सभेत २८४ सदस्य होते ज्यात २१० सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये १५ हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, पारसी आणि एग्लोन भारतीयांचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेने देशाची उद्दीष्टे व त्यांचे आदर्श यांची रूपरेषा ठरविताना योद्धा मोहनदास करमचंद्र गांधी वगळता अनेकांनी स्वाक्षर्‍या केल्या ज्या त्या वेळी मोहनदास करमचंद्र गांधी यांचे निधन झाले होते. भारतीय संविधान संविधानाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद आणि भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आले.

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नोंदलेल्या “आम्ही भारतीय लोक” यावर आपले लक्ष केंद्रित करताना डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले की, जर या भारतीय घटनेची नीती व नैतिकतेने अंमलबजावणी केली गेली तर त्याचे चांगले परिणाम होतील आणि जर तो अपवित्र आणि विचित्रपणाने अंमलात आला तर हे वाईट परिणाम देईल त्याचा अर्थ असा आहे की जर भारतीय राज्यामध्ये लोकशाही आणि लोकशाही राजवटीचे अस्तित्त्वात असलेले आणि प्रख्यात स्वातंत्र्य आणि शिस्त आणि संघटना आणि भारताचे विकास आणि नैतिकतेचे वर्ष, तर भारतीय संघराज्य न्यायालयीन स्वायत्त पारदर्शक ही भारतीय राज्यघटना जगातील सर्वात चांगले परिणाम देईल ही प्रणाली चालविली गेली आणि अंमलात आणली गेली , आणि जर ब्रिटीश विधानसभेच्या संसदीय कामकाजावर शासन केले गेले आणि अंमलात आणले गेले तर भारत लोकशाही आणि अनुशासनात्मक लोकशाही आणि फूट पाडण्याचे व नष्ट करण्याचे राजकारण करीत असेल. जगातील सर्वाधिक दुष्परिणाम देईल.

भारतीय संविधान सभाची पहिली बैठक सोमवारी, ०९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेवर १५४ महिलांसह २८४ सदस्यांनी स्वाक्षरी केली होती. २६ जानेवारी १९५० रोजी तो एक लोकशाही देश, लोकशाही राष्ट्र (प्रजासत्ताक दिन) म्हणून घोषित करण्यात आला. भारतीय संसदेच्या सभागृह, दिल्लीच्या ग्रंथालयात सर्वोच्च विद्वान आणि स्व-मतप्रवाह कॅलिग्राफिस्ट, श्री प्रेम्बिहारी नारायण रायजादा यांनी हिंदी व इंग्रजी भाषेत हस्तलिखित भारतीय संविधानाची प्रत सुरक्षित ठेवली होती. जी सध्या आर्द्रता मीटर आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हे सुरक्षित आहे. ज्याचे भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि त्यांच्या तपासणी दरम्यान, त्यांनी या #भारतीय घटनेच्या #शेवटच्या पानावर संबंधित #84 सदस्यांची स्वाक्षरी पाहिली आणि जवाहरलाल नेहरूंच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्वाक्षरी असल्याचे त्यांनी पाहिले. नाममात्र जागा सोडण्यासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या संक्षिप्त आणि पातळ तिरकस सही केली आहे. संबंधित लोकांना माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे. म्हणूनच, सर्व भारतीय नागरिकांना हे माहित असले पाहिजे की भारतीय राज्यघटनेचे लेखक कॅलिग्राफिस्ट श्री. प्रेम्बिहारी नारायण रायजादा आहेत. भारतीय राज्यघटनेचे लेखक डॉ भीमराव आंबेडकर नाहीत...!

(पुरावासाठी संविधान च्या मूळ प्रतीवर प्रत्येक पेजवर खाली दिलेले प्रेम नाव तपासून घेणे)

साभार :- ब्लॉगर आकांशा सक्सेना

👉Yancha janm kadi zalta Ani mrutu kadi zala

👉प्रेम बिहारी नारायण रायजादा हे एक कॅलिग्राफी आर्टिस्ट होते. भारतीय संविधानाचे त्यांनी हस्तलिखित तयार केले.

भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीची छपाई न होता ते हातांनी लिहिले गेले होते, ते हात होते प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचे.

हे म्हणजे असं झालं की महाभारताचे लेखक कोण ? व्यास की गणपती ?

येथे गणपतीचे काम प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले आहे.

धन्यवाद!

♨️संविधान दिवस 26 नोवेम्बर संविधान म्हणजे भारताचा आत्मा

संविधान लिहिल्यानंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु

संविधान म्हणजे भारताचा आत्मा

1📘📖 - विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??

394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर

2📘📖- महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले; शाळा चालू केले; त्या शाळेचा क्रमांक 395 होता; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले

3 📘📖- संविधानाच्या या मसूदा समितीवर सात लोकांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला, एक विदेशात गेला, एकाची तब्येत ठीक नव्हती, एक राजकारणात अडकला.

4📖- त्या मुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडली व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत.

5📘- संविधानाची सुरूवात कशी करावी ?

यावरून वाद चालू होता

त्यात मौलाना हजरत मोहली म्हणून लागले की; संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे

पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" या नावाने सुरू करा

एच. पी. कामत म्हणाले की "ईश्वर "नावाने सुरू करा

मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा मग यावर मतदान झाले मग बाबासाहेब आंबेडकर यांना 68 मते पडली तर देवाच्या नावाने 41 मते पडलीय संविधानाची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" या नावाने झाली; पहिल्याच मतदानात दगडाचे देव हरले व माणूस जिंकला

6📘- संविधानाचा कच्चा मसूदा बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते; त्या वेळी बॅ. पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले

7📘- यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यां चे स्वागत केले; तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा बॅ. पंजाबराव देशमुख यांना दाखवून म्हणाले; की "दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा, मी थोडया वेळात येतो" असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले

8📘- परत आले तर बॅ. देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून बाबासाहेब म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ?

यावर देशमुख यांनी सांगितले की बाबासाहेब "माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा" हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे आलो होतो;

पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत

9📕- महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल; त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही;

पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल;

मग तो राजग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केला

10📙- अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या ३०० वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ? त्यांनी जाहीर केले होते की जगात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न; विद्वान आहेत; father of modern India is Dr ambedkar

11📕- कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की "SYMBOL OF KNOWLEDGE "

12-📙 तेथील कुलगूरूच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे

व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला"

13📙- नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान

Log into Facebook | Facebook

14📕- संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते म्हणून मला अडचण आली नाही"

15📙- बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असू दया पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान कुचकामी ठरते; म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान

16📕- संविधान लिहून झाल्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की " मी बहुजनाच्या कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत"

मला यांच्यावर विश्वास बसत नाही की ते संविधान जशाच्या तसे लागू करतील

संविधान निर्मितीची वरील घडामोडी व कर्मकहाणी सगळी कडे पोहचवा व संविधान विषयी कृतज्ञता बाळगा...

संविधान दिनांच्या सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक सदिच्छा 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

👉मला वाटले होते कि बाबासाहेबांबद्धल एवढी मेहनत घेऊन लिहिलेली माहिती बहुतेक सर्व जण वाचून UPVOTE करतील पण तसे काही नसते. फक्त १८ लोकांनी UPVOTE केले आहे. लोकांची बाबासाहेबांना अजूनही जातीपातीत पाहण्याची मनोवृत्ती कधी बदलेल देव जाणो ....!!!

♨️जय भीम, उत्तर नाही असेच आहे. फक्त डॉ.आंबेडकरांनी लिहिले असे म्हणणे म्हणजे संविधान तयार कसे झाले किंव्हा त्याची प्रोसेस काय होती याबद्दल माहिती नसल्यासारखे आहे. डॉ.आंबेडकर अर्थातच संविधानाचे जनक मानले जातात आणि ते मानले जातीलच याचा अर्थ संपूर्ण संविधान लिहून काढले असा त्याचा अर्थ होत नाही, संविधान बनविण्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली होती आणि त्यात ३४९ जण होते, अर्थात हे ३४९ लोक विद्वान, उच्चशिक्षित आणि सर्व जाती-धर्माचे प्रतिनिधित्व करणारी होती, मात्र त्यातील २९९ लोक राहिले आणि त्यांनी एकूण 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवसांंमध्ये 114 दिवस वाद-विवाद (म्हणजे डिबेट - आत्ता करतात तशी नव्हे), आणि एकूण 12 अधिवेशन केले त्यात 284 सदस्यांनी हस्ताक्षर देखील केले तसेच संविधान बनविण्यासाठी 166 दिवस बैठक केली गेली यात प्रेस आणि जनतेला भाग घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते तसेच आधीच अधिनियमित केले गेलेले आहेत अश्या ६० देशांच्या घटना मासुद्यांचा अभ्यास करण्यात आला (कॉपी नव्हे) (जसे तुम्हाला एखादे घर कसे बांधावे याविषयी माहिती नसते तेव्हा इतर लोकांनी घरे कशी बांधली आहेत हे आपण पाहता, अगदी तसे). मात्र ३४९ जणांच्या समोर एक एक मसुदा डॉ.आंबेडकर ३ वेळा सादर करीत असत आणि त्यावर विद्वानांचे मत, लॉजिक, भविष्यातील शक्यता, इतर जाती-धर्मातील प्रतिनिधींच्या हरकती इत्यादी बाबींवर सखोल चर्चा करून अंतिम मसुदा अध्यक्ष महोदयांसमोर सदर करून तो अंतिम मत मोजणी होऊन मंजूर केला जात असे कित्येक दिवस आणि रात्र काम चालू होते. असे फक्त त्यावेळेसच शक्य होते, असे म्हणण्यास हरकत नही कारण त्या काळात अनेक ज्ञान पिपासू व्यक्तिमत्व होते जे जातीभेद आणि धर्मभेद न करता निव्वळ बौद्धिक कसोटी आणि इतरांची मते यावर आधारित संविधानाचा मसुदा तयार करत होती जे आजच्या नव्हे तर पुढील १०० वर्षात देखील होणे शक्य नाही.

इतिहास साक्ष आहे कि डॉ.भीमराव आंबेडकर यांनी 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवसांंमध्ये जी मेहनत आणि जे कष्ट घेतले ते इतर कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तीचे काम नाही, किंबहुना डॉ.बेनेगल राव हे सल्लागार होते आणि यांनी कच्चा मसुदा (संविधानाचे प्रथम प्रारूप) तयार केला यात कोणतीही शंका नसावी, परंतु पक्का मसुदा डॉ.भीमराव आंबेडकर यांनीच केला त्यामुळे संपूर्ण श्रेय त्यांनाच दिले जाते. कारण डॉ.भीमराव आंबेडकर एक असे व्यक्तिमत्व होते कि जर ते नसते तर संविधान बनविण्याचे काम कोणी हातात घेतले नसते आणि जरी कोणी हाती घेतले असते तरी जे काम त्यांनी केले ते कोणीही करू शकले नसते हे सर्वमान्य आहे आणि सूर्यसत्त्य आहे, बाकी आपण सुज्ञ आहात.

👉सविस्तर माहीती, छान उत्तर.

👉संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटना एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करतात..

सदर प्रश्नांविषयी विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे…पुढील काही तथ्य वाचून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी आशा बाळगतो..

१) मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णम्माचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात,"

सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम बाबासाहेबांनी पार पाडले. ते निःसंशय आदरास पात्र आहेत.याचा अंतिम परिणाम असा झाला की, या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डाँ.आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निःसंशय, अत्यंत समर्थपणे पूर्ण केले, याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत..

२)घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,

"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."

काही जण बाबासाहेबांनी जे मनात आलं ते भारतावर लादून दिलं, गरज नसताना आरक्षण दिल इत्यादी आणि अशा समजुतीतून संविधानाचाच विरोध करतात…पण हे त्यांना माहीत नसते की बाबासाहेबांनी मसुदा तयार केल्यावर प्रत्येक आर्टिकल ला मंजूर करून घेण्यासाठी कित्येक चर्चासत्र झालेत, त्यात बाकी महत्वाचे लोक देखील होते, त्या सगळ्यांना प्रत्येक आर्टिकल चं महत्व आणि गरज बाबासाहेबांना पटवून द्यावी लागली त्या नंतर च सगळं मान्य झालं

….जय भीम….

👉ती संविधान सभा होती आणि तिथे 389 लोक होते.

संविधान सभेच्या 22 उपसमित्या होत्या, त्यातील महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती या समितीमध्ये एकूण 7 व्यक्ती होते {1+6} अध्यक्ष+ सदस्य आणि अध्यक्ष हे डॉ.आंबेडकर होते

याच समितीने घटनेचा मसुदा तयार केला

♨️

  • आधुनिक भौतिकशास्त्राचा जनक सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एकट्याने सर्व आधुनिक भौतिकशास्त्राचे सिद्धांत सांगितले नाहीत, मात्र त्यांनी या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यामुळे त्यांना या क्षेत्राचा जनक मानले गेले.
  • आधुनिक अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ यांनी एकट्याने सर्व आधुनिक अर्थशास्त्राचे सिद्धांत मांडलेले नाहीत, मात्र त्यांनी या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यामुळे त्यांना या क्षेत्राचा जनक मानले गेले.
  • मराठा/हिंदवी स्वराज्याजे संस्थापक शिवाजी महाराज यांनी एकट्याने मराठा साम्राज्य उभारले नाही, त्यासाठी त्यांना विविध जाती-धर्मातील मावळ्यांनी सहकार्य केले, मात्र त्यांनी या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यामुळे त्यांना या क्षेत्राचा संस्थापक मानले गेले.
  • याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने संपूर्ण भारताचे संविधान लिहिलेले नाही, मात्र त्यांनी या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यामुळे त्यांना संविधानाचे जनक मानले गेले. संविधान निर्मितीत एकट्या डॉ. आंबेडकरांचे योगदान ९५% पेक्षा जास्त आहे. ते संविधान सभेच्या केवळ मसूदा समितीतेच अध्यक्ष नव्हते अन्य चार पेक्षा अधिक समित्यांचे सुद्धा सदस्य होते. त्यांचे योगदान केवळ संविधानाचे लेखनापूरते मर्यादित असून इतर बाबींत सुद्धा आहेत. तेव्हा आंबेडकरांएवढा संविधानाचा गाढा अभ्यास भारतातच नव्हे तर जगातही कुणाचा नव्हता.
♨️नाही; ते केवळ डॉ भीमराव रामजी अम्बेडकर नव्हते तर त्यांच्याकडे खालील व्यक्तींचा समावेश असलेल्या ज्ञानी तज्ञांचा एक गट होता.

डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर, 6 डिसेंबर 1 9 46 पासून 26 जानेवारी 1 9 50 पर्यंत भारतीय संविधान अंमलात आणण्यासाठी संवैधानिक मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

मसुदा समितीचे सात सदस्य होते: अलादी कृष्णस्वामी अयर, एन गोपालस्वामी; बीआर अंबेडकर, के. एम मुंशी, मोहम्मद सदाला, बी. एल. मिटर आणि डी.पी. खेतान

30 ऑगस्ट 1 9 47 रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत मसुदा समितीने बी. आर. अंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.

हे लक्षात घेण्यासारखे आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद 370 चे तीव्र विरोध केले होते आणि स्वातंत्र्योत्तरानंतरच्या इस्लामिक सिद्धांतांनाही तीव्र विरोध दर्शविला होता.

👉आपण संविधान लिहिले असे म्हणू शकत नाही कारण ते बनवले गेले आहे. त्याशिवाय का इतर देशांच्या संविधानाचा संदर्भ भारताच्या संविधानात सापडतो?

👉हो तुमचे तर्क बरोबर आहे

👉खूप खूप आभार !

👉संसदीय लोकशाही फक्त भारतातच आहे .

👉हे सहा जण सोबत होते पण संविधान बाबासाहेबानीच लिहीले कारण या सहा जणांना एका शुद्र माणसाबरोबर काम कनसल्यामुळेच काहीच लिहीले नाही

👉नाही, ते सर्व घटना समितीतील सभासदांनी आणि भारतीय लोकांनी मान्यता देऊन, लिहले आहे.

हा पण ह्यात २ व्यक्ती चा वाटा हा सिंहा चा आहे.

१. पंडित नेहरू(ऑब्जेक्टिव्ह रिसोल्युशन -१३ डिसेंबर १९४६ ह्यावर आपली घटना मूळ ता आधारित आहे)

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

जे भारतीय घटनेचा अभ्यास करता किंवा जे UPSC /MPSC अभ्यास करता त्यांना नेहरू चे घटने मधील योगदान माहित आहे.

♨️हे उत्तर पुरे क्लिप वर पहा किव्हा यु ट्यूब वर सर्च करा

31 Dr. Ambedkar excellent speech presenting Constitution of India

Comments

Popular posts from this blog

ब्रिटिशांनी जर अजून थोडा काळ भारतावर राज्य केले असते, तर आज भारत हा प्रगतशील देश असता का?