ब्रिटिशांनी जर अजून थोडा काळ भारतावर राज्य केले असते, तर आज भारत हा प्रगतशील देश असता का?

फुल्स्टोप च्या चालताहेत.५० वर्ष पर्यंत आपला देशाचा बजेट ५ वाजता सांगितला जायचा, त्या वेळेला इंग्लंड मध्ये सकाळचे ११.३० वाजले असायचे, ह्या पेक्षा अजून दुर्देवाची गोष्ट कोणती.....गुलामीचा प्रतीक प्रत्येक शहरात उभी आहेत, रस्त्याच्या नावापासून, ते त्यांनी बनवलेल्या ऐतिहासिक स्मारकांचा.........सर्वात घाणेरडी सिमेंट पद्धत ब्रिटिशांनी आणली, आपल्या देशात........ आपण चुना मिश्रित किंवा माती पासूनच घरे इमारती तयार करायचो, त्यामुळे ती जास्त काळ टाकायची, सिमेंट ची मॅक्सिमम लाईफ ५० वर्षे आहे....ज्या ब्रिटिश खेळ क्रिकेट ने अनेक राजांना / शेतकऱ्यांना रसातळाला मिळवला, तो क्रिकेट चा खेळ आज स्टेटस ऑफ सिम्बॉल झाला आहे,ह्या वेड्याना सांगणार कोण ज्या ज्या देशात ब्रिटिश सरकारने राज्य केलं तेच देश क्रिकेट खेळतात.आज ७२ वर्ष झाली तरी शेजारी स्वतःचा भाव ठरवू शकत नाही....पण केस कापणारा असो किंवा शूज पोलिश करणारा कामगार ...आपले दर ठरवू शकतो....अशी साधी भोळी मानस येथे राहतात .....वीज बिल वाढो, चू नाही करणार, रोड टॅक्स देतील त्यावरून टोल टॅक्स सुद्धा देणार......पण चू नाही करणार......

👉आपण मांडलेली मते बहुतांशी ठीक आहेत, परंतु परिस्थिती इतकीही निराशाजनक नाही. शेकडो वर्षांपासूनची गुलामीची सवय व चिन्हे जायला थोडा वेळ लागत आहे, हे कबूल, मात्र तसा प्रयत्नच होत नाही असे मात्र नाही. सर्वात आधी नोकरशाहीला वेसण घालावे लागेल, हे अगदी बरोबर!

👉सर्व सामान्य देश बांधवांना शिक्षणा पासून वंचित ठेऊन मूठभर लोकं प्रगत जाहली स्वतःला उच्च व विद्वान समजणारे शुक्राचार्य आज हीं त्याच वृत्तीचे आहेत यांच्यामुळेच देश परकीय आक्रमणास बळी पडून धर्मांतर जाहलीं बहुत

सर्वात प्रथम हे आपल्या पचनी पडले पाहिजे कि भारतास राजकीय स्वातंत्र्य मिळाले ते काही भारतात झालेल्या छोडो भारत सारख्या अहिंसक चळवळींमुळे किंवा उपोषणामुळे ब्रिटीशांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना उपरती झाली म्हणून किंवा भारतावर राज्य करण्यात त्यांचा आर्थिक फायदा शिल्लक राहिला नव्हता म्हणून नाही. ब्रिटिशांनी भारत स्वेच्छेने सोडला नाही तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटनची जी काही प्रचंड हानी केली त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन दुबळे झाल्यामुळे त्यांना भारत सोडावा लागला.

भारतासारखा देश हा ब्रिटिशांना कायमच हवा होता म्हणून तर त्यांनी गुंतवणूक करून इथे रेल्वेमार्ग, पाण्याचे कालवे, प्रशस्त रस्ते, उंच उंच इमारती वगैरे वगैरे निर्माण केले. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने दुसरे महायुद्ध झाले आणि स्वातंत्र्य भारताच्या पदरात पडले. हे लिहिण्यात स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा अपमान करणाऱ्या वीरांची मानहानी करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. त्यांना कोटी कोटी प्रणाम. पण त्यांचे १८५७ पासून त्यांचे चाललेले प्रयत्नांना यश येत नव्हते हे मात्र सत्य आहेच कि. असो.


जर ब्रिटिशांनी अजून काही वर्षे भारतावर राज्य केले असते तर

  1. भारताची लोकसंख्या आज १३४ कोटी नसती तर ती फार कमी असती.
  2. भारतात अजून अनेक मोठे रस्ते, विमानतळ, लोहमार्ग बांधले गेले असते.
  3. आज भारतात जे गांधी आणि आंबेडकरांचे पुतळे दिसतात त्या ऐवजी इंग्रज अधिकाऱ्यांचे पुतळे दिसले असते पण अर्थातच ते संख्येने फारच कमी असते आणि त्यांची व्यवस्थित निगा राखली गेली असती.
  4. आज जे धपाधप पूल कोसळत आहेत त्यातले जेवढे इंग्रजांनी बांधलेले दिसतात त्यापेक्षा जास्त १९४७ नंतर बांधलेले दिसतात. म्हणजेच त्या पुलांची अवस्था चांगली असती किंवा बरेच पूल नव्याने बांधले गेले असते.
  5. भारतीय लोकांनी कायद्याचा आदर केला असता असे मी म्हणणार नाही कारण ते आपल्या रक्तातच नाही परंतू कायद्याची दहशत नक्कीच असती.
  6. भारतात काही घराणी आज त्यांच्या राजकारणातील सहभागामुळे नावारूपास आली आहेत. इंग्रजांच्या राज्यात त्यांना आजच्यासारखा भाव मिळणे अवघड होते. नेहरू आणि अब्दुल्ला घराणे जर अपवाद म्हणून बाजूला ठेवले तरीही राणे, भुजबळ, पवार, मुंडे, विखे पाटील, मोहिते पाटील, अमके पाटील आणि तमके पाटील वगैरे जे नवीन सरंजाम निर्माण झाले ते झाले नसते.

यातून भारताचा विकास झाला असता असे मी म्हणणार नाही कारण या परिस्थितीत भारतातील काही उद्योगशील घराणी आणि राजकीयदृष्ट्या पुढे असणारी घराणी श्रीमंत झाली असती. भारताशी व्यवहार केल्यामुळे जो काही नफा झाला असता तो तर सर्व युरोपातच पाठवला गेला असता.

आज भारतावर अमेरिकेचा प्रभाव आहे त्या ऐवजी तो ब्रिटनचा असता.

“ भारतीय स्वत: चं राज्य स्वत: चालवण्याच्या लायकीचे नाहीत.

तुम्ही जर आता भारताला स्वातंत्र्य दिलंत तर २५ वर्षांच्या आत हा देश गुंड मवाल्यांच्या हातात जाईल”

स्वातंत्र्योत्तर काळात ………

👉माझ्या मूळ उत्तरात चर्चिल यांचे वाक्यच आता टाकले आहेल.

👉नितीन साहेब तुम्ही हे विसरलात कि अफगाणिस्तानात अफगाणी लोकांनी ब्रिटिशांची जी हालत केली ती भारतीय लोंकासाठी प्रेरणा होती.कदाचित तसे प्रयत्न केले असते तर भारत लवकर स्वतंत्र झाला असता

👉तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.

पण ह्या अशा नाजूक मुद्द्यावर अगदी पुरावे देऊनसुद्धा मनमोकळे मत व्यक्त केले कि कोराकडून लगेच ताकीद देण्यात येते …. तसा मला कोरावर बंदी होण्याचा पुरेपूर अनुभव आहे. दुसऱ्याची मते ऐकून घेण्यासाठी जी मानसिकता लागते ती आपल्यात नाही म्हणून जरा सौम्य भाषेत लिहिले जाते.

👉मला हा मुद्दा इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो. मत मांडण्याचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे. मग ते योग्य/अयोग्य, उचित/अनुचित, विधायक/विघातक आहे किंवा कसे हे जनतेला ठरवू द्या. त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीला ठरवू द्या. त्यात निष्पक्षता खूप महत्त्वाची.

👉तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे.कधी-कधी तशी कुऱ्हाड आमच्यावरही चालते.

👉इंग्रज आले ते त्यांच्या स्वार्थ साठी आणि गेलेही त्यांच्या स्वार्थासाठी . आज आपण भारतीय यामुळेच मागे आहोत कारण आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहिलो. आज आपण स्वतचं अस्तित्वच नष्ट केल आहे. आपल्या देशातील खुप कमी लोकांना आत्मनिर्भर भारत हे म्हणणं पटत आणि ते त्यावर काम करतात. इंग्रजांनी इथ येवून त्यांचं अस्तित्व निर्माण केलं. आणि आपण आपल नष्ट केल असच म्हणावं लागेल.

👉आले ते स्वार्थासाठी आणि गेले ते दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीकडून जोरदार दणका खाल्ल्यामुळे आणि परिणामतः व्यवस्थापन खिळखिळे झाल्यामुळे राज्य करता येणे अशक्य झाले म्हणून. ….. अमेरिकेच्या वजनामुळे [अटलांटिक करार]

👉राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीचा अभाव.

👉स्वातंत्र्याचा अर्थ जो पहिली पन्नास वर्षे समजला नाही तो सुरुवातीलाच समजला असता.टिळक व आगरकरांच्या विचारसरणी हाच फरक मोठा दिसतो.

👉बरोबर आहे, दुसय्रा महायुद्धात जर्मनीने ब्रिटिशांना एवढे खिळखिळे करून सोडले की त्यांना भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

👉भारतीय संविधान सुद्धा इंग्लंडचा कायद्यावर अवलंबून आहे. भारतीय संविधान म्हणजे खिचडी. अमेरिका चे fundamental rights,fundamental duties एका देशाकडून. मात्र पालन काहीच करायचं नाही.

👉भारतीय संविधान सुद्धा इंग्लंडचा कायद्यावर अवलंबून आहे. भारतीय संविधान म्हणजे खिचडी.खरच आहे हे, पण घटनाकारांनी जे आपल्या देशासाठी चांगले, योग्य, उत्तम तेच आपल्या संविधान मध्ये घेतले आहे. संविधानाला खिचडी म्हणणे म्हणजे आपन किती कल्पना दरिद्री आहात याचे प्रदर्शन आहे. बाकी आपनास अति उत्तम संविधान लिहिण्यास कुणिही मना केल आहे काय???

👉एकदम बरोबर आहे सर........ परफेक्ट विशलेशन आहे हे..... 100% सहमत आहे

👉सर भारतातले ८० टक्के नियम/कायदे इंग्रजाचे आहेत-- indian contract act 1872, indian penal, negotiable instrument act 1881,. The Indian Partnership Act, 1932, मग भारतात असं का झाल.

👉आपला कायदा काळाच्या मागे आहे हे नक्की पण ब्रिटीश काळात संमत केलेल्या कायद्यात वेळोवेळी बदलही केलेले आहेत.

👉बर झिम्बाब्वे ला स्वातंत्र्य मिळाले 1980 साली , तर ते प्रगत का नाही ? ब्रिटिशचा उद्देश स्पस्ट होता ,White Colonization . दक्षिण अफ्रीका हा सर्वात चांगल उदाहरण, उत्तम प्रशासन हा फक्त स्श्वेत लोकांसाठी होता. बालाजी विश्व नाथन यांचे उत्तर पाहा. भारतातील रेल्वे ही लोकसाठी नाही तर ती अंतगर्त ह्र्दयप्रदेश मधून कच्चा माल बंदरकडे सहज नेता यावी यासाठी करण्यात आली. नदीजोड प्रकल्प याचा विचार ब्रिटिश काल मधे सुद्धा सर्वे करन सोडून देण्यात आला. कारण " we are getting from India what we want".

♨️नाही याला खालीलप्रमाणे कारणे देता येतील

१. ब्रिटिश हे काही समाजसेवक नव्हते तर ते भारतावर त्यांच्या स्वार्थासाठी राज्य करत होते. भारतातून त्याना मोठ्या प्रमाणावर कच्चा माल , स्वस्त मजूर , लढण्यासाठी भारतीय सैन्य मिळत होते. जर का ते अजून राहिले असते तर त्यांनी त्याचा अजून 'चांगल्या ' प्रकारे वापर केला असता आणि ज्या गोष्टी भारताच्या विकासाला कारणीभूत व्हायला हव्यात त्यांनी ब्रिटिशांचा विकास केला असता.

२. असं म्हणतात कि भारतातील लोकशाही हि ब्रिटिशांची देण आहे पण असं काही नाही कारण ती काही भारतीयांना सहजपणे मागून मिळाली नाही तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हजारो लोकांमुळे मिळाली आहे.

३. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटन ची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली होती त्यामुळे त्यांनी ती सावरायला या मोक्याच्या वसाहतीचा चांगलाच फायदा उठवला असता . भारत प्रगतिशीलच काय, कायम मागास राहिला असता.

४. ब्रिटिश असेपर्यंत त्यांनी हिंदू मुस्लिम समुदायात फूट पाडून यशसवीरीत्या राज्य केले, तेच धोरण त्यांनी पुढेपण सुरूच ठेवले असते, ज्याचा परिणाम म्हणजे सतत दंगली उठल्या असत्या.

५. १९४७ मध्ये भारतात ६०० च्या वर संस्थानिक होते. इतके दिवस त्यांचा चलाखीने वापर करून ब्रिटिशांनी त्यांना भारतीय होण्यापासून रोखले होतेच शिवाय त्यांचा सामाजिक चालवली दडपण्यात चांगलाच वापर करून घेतला असता. अशात जर ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता तर आपली अवस्था आजच्या मध्य -पूर्व आशिया सारखी झाली असती आणि त्यांच्यात सतत युद्धे झाली असती. संपूर्ण भारत झालाच नसता .

६. भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर नेहमी ब्रिटिशांचा पगडा राहिला असता.

यावरून हाच निष्कर्ष काढता येईल कि ब्रिटिश अजून थोडा काळ राज्य केले असते तर भारत मागास राहिला असता किंबहुना भारतच राहिला नसता .

👉योग्य विश्लेषण

♨️नाही. ब्रिटिश सोडून जाताना कोण लोक त्यावेळी होते यावरून आपण अंदाज करू शकतो. त्यावेळी लंपट गांधी आणि नेहरू मुल्लासारखी लोक, जी ऊस गोड लागल्यावर ऊस तोडत नाही तर मुळासकट उपटतात, ती होती त्यामुळे भारत देश आफ्रिका no.2 चा देश झाला असता, प्रगतशील नाही. त्या लोकांनी केलेली कामाची फळ आतापर्यंत भोगतोय आणि पुढेही भोगणार. मग जर विचार करा, ब्रिटिश थोडा अधिक काळ म्हणजे या लोकांना थोडा अधिक काळ, यांनी काय दिवे लावले असते. मला वाटते दिवे काय घेऊन बसलात लक लक चंदेरी करून टाकलं असतं.

👉आणि उरल्या-सुरल्या क्रांतिकारकानासुध्दा यांनी फासावर लटकावले असते.

गांधी आणि नेहरू याना विरोध म्हणजे देशद्रोह असे समीकरण तयार झाले असते.आणि देशाविरुद्ध युद्ध झाले असते तर सीमेवर तरुणांना चरका घेऊन बसा म्हणायलाया सुध्दा याना लाज वाटली नसती.

👉तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. जसं चंद्रशेखर आझाद यांना नेहरूंने पकडून दिलेलं, त्या जोडगोळीने उरल्यासुरल्याकांतिकारकांनासुद्धा मारून टाकलं असतं. देशातील युवकांना इसाई करून देशद्रोही लोकांचे नोकर बनवून टाकलं असतं.

👉खूप झालं …अजून विचार करा

♨️आत्ता पेक्षा जरा जास्तच प्रगत असता. फरक फक्त इतकाच असता की, श्रीमंतांच्या यादीत फक्त ब्रिटिश व काही घराणी असती. नवीन विमानतळ व लोहमार्ग असते पण ते सामान्य माणसांना परवडण्यासारखे नसते. कारण ती फक्त त्यांच्या सोयीसाठी उभारलेली असती. त्यांच्या दरवाजावर Indians & Dogs not allowed असे लिहले असते. समानता तर नक्कीच असती कारण त्यांच्यापुढे अजूनही आपण गुलाम म्हणूनच असतो.

♨️ब्रिटिश लोकांनी आपले पुरेपूर शोषण चालू ठेवले असते. प्रत्येक महापूर, भूकंप, रोगांच्या साथी या प्रसंगामध्ये फक्त गोऱ्यांचे आणि त्यांचे पाय चाटणाऱ्यांचे हित पाहिले गेले असते.

कुठलेही उद्योग धंदे, मूलभूत सुविधा यांचा वापर करण्यासाठी भारतीय लोकांना प्रचंड संघर्ष करावा लागला असता.

जरी आपल्या नेते लोकांनी त्यांच्या भ्रष्टाचारामुळे आपली खूप प्रगती होऊ दिली नसली तरी ब्रिटिश आपल्या डोक्यावर बसलेले राहिले असते तर आपण आजच्यापेक्षा शेकडोपटीने वाईट अवस्थेत असलो असतो हे नक्की!

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या असंख्य प्रसिद्ध आणि अनाम स्वातंत्र्य योद्ध्यांचे आभार आपण कितीही मानले तरी कमीच आहेत!

♨️भारतीयांना मागासलेले ठेवण्यात ब्रिटीशांचा स्वार्थ होता. ग्राम्य पण स्पष्ट शब्दात सांगायचे तर हे इंग्रज खाल्ल्या पानावर **** होते. जाताना *** गेलेच; भारताचे शेकडो तुकडे करून ! हिंदू मुसलमान भाडण लावून; आपल्याला रक्तबंबाळ करून.

हे अतिनीच लोक आम्हाला काय प्रगतिशील होऊ देणार होते का ?

Comments