इंग्रजांनी भारतात स्थिर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब केला?
भविष्यात आपला मुकाबला मराठ्यांशी होणार, हे इंग्रज जाणून होते. म्हणून कंपनी सरकारने कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम मध्ये इंग्लंडहून हिंदुस्तानात आलेल्या तरुण होतकरू अधिकाऱ्यांसाठी जी प्रशिक्षण संस्था चालवली होती, त्यात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात मराठीचा समावेश होता. कलकत्त्याजवळ श्रीरामपोर येथील डॉ. विल्यम कॅरे याने १८१० साली मराठी भाषेचा कोष तयार केला, मराठी भाषेचे व्याकरण तयार केले आणि बायबलचे मराठी भाषांतर केले.
आपल्याला ज्यांच्यावर राज्य करायचे आहे, त्यांचा इतिहास आणि संस्कृतीची माहिती करून घेण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. सर विल्यम जोन्स या ‘एशियाटिक सोसायटी’च्या संस्थापकांनी संस्कृत आणि फारसी भाषा शिकून, अभ्यास करून तेरा खंडात लेखन प्रसिद्ध केले. त्याशिवाय स्टुअर्टने बंगालचा, ले. कर्नल जेम्स टॉडने राजपुतांचा, कनिंगहॅमने शिखांचा, माल्कमने माळव्याचा, जॉन ब्रिग्जने मुघलांचा, विलकसने म्हैसूरचा आणि ग्रँट डफने मराठयांचा अभ्यास करून पुस्तके लिहिली.
१७७५साली चार्लस मॅलेटची पुण्यात इंग्रजांचे वकील म्हणून नेमणूक झाल्यावर त्याने त्याच्या बारा वर्षांच्या वास्तव्यात सर्व पैलूंचा व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित नोंदी करून ठेवल्या होत्या आणि त्याचा इंग्रजांच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याचा विचार केला होता. त्यामुळे मराठयांची दुर्बल स्थाने इंग्रजाना समजून त्यांचा मार्ग सुकर झाला.
इंग्रजांच्या अभ्यासू वृत्तीमुळे मराठेशाहीच्या अखेरीस योग्य निर्णय घेता आला. बाजीरावावर हल्ला करून त्याला ठार मारणे किंवा पकडणे इंग्रजाना अशक्य नव्हते. अशा वेळी इंग्रजांनी विचार केला की, बाजीरावाला मारले, तर त्याच्याविषयी मराठयांच्या मनात सहानभूती निर्माण होऊन मराठे एका निशाणाखाली गोळा होतील आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे झाले, त्याची पुनरावृत्ती होईल. त्याला जर पकडले तर त्याला सोडविण्याचे प्रयत्न होतील. यावर उत्तम मार्ग म्हणजे त्याची कोंडी करून त्याला शरण येण्यास भाग पाडून त्याला सुखाने पेन्शन खाऊ द्यावे.
हाच प्रयोग इंग्रजांनी टिपू सुलतानाच्या मुलांवर केला. त्याबाबत वेलस्लीने आशा सूचना दिल्या होत्या की, टिपूच्या मुलांना पाहिजे असतील तितक्या बायका आणि रखेल्या ठेऊ द्या, त्यांना त्याबाबत बिलकुल मज्जाव करू नका. त्यांना मिळणाऱ्या पैशाचा असा चैनीत खर्च होणे चांगले, म्हणजे या पैशाचा उपयोग आपल्याला त्रासदायक होणार नाही.
इंग्रज अधिकारी निस्वार्थपणे काम करीत असत. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, तेव्हा इंग्रजांनी महाराजांना खंडणी देण्यास नकार दिला होता. त्याबद्दल औरंगझेबाने इंग्रजाना बक्षीस देऊ केले. परंतु इंग्रजांनी बक्षीस न घेता त्या बदल्यात जकात माफ करण्याची मागणी केली. यानंतरच्या काळात १७१३ साली फररुखसेयर बादशाह झाला. त्याने जोधपूरच्या अजितसिंगचा पाडाव करून त्याची मुलगी इंद्रकुमारी पकडून दिल्लीस आणली आणि तो तिच्याशी लग्न करणार होता. पण त्या सुमारास त्याला मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे लग्न लांबणीवर पडले. त्यासुमारास बंगालमधून इंग्रजांचे एक शिष्टमंडळ काही मागण्या घेऊन बादशहाला भेटायला आले होते. त्यात हॅमिल्टन नावाचा सर्जन होता. त्याने बादशहाचे ऑपरेशन करून बादशहास बरे केले. बादशहाने डॉक्टरला बक्षीस देऊ केले, तेव्हा वैयक्तिक बक्षीस नाकारून इंग्रजाना जकात माफ करण्याची विनंती केली.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. अशा अनेक गोष्टींमुळे इंग्रज भारतात स्थिर झाले.
👉निस्वार्थपणे kaam karat hoti aani aapan इथेच कमी पडतो
👉दुनियाभर फिरून आलाल्या इंग्रजांना लक्षात आले की ज्या भारतीयांवर आपण राज्य करू इच्छितो त्या भारतीयांचा बौद्धिक आवाका खूप मोठा आहे ,पण भारतीयांच्या अभ्यासू वृत्तीला चिकित्सक वृत्ती ,शिस्तबद्ध मांडणीची जोड नाही,जी इंग्रजांनी दिली.मुळात भारतीयांकडे असलेल्या सखोल विचारशक्तीला युरोपियन तर्कशुद्धतेची जोड इंग्रजांमुळे मिळाली.त्यानी भारतीय लीपी जिवंत ठेवल्या, कारण त्या रोमन लीपीपेक्षा ज्यास्त रॅशनल आहेत.
👉एका ब्रिटिश अधिकाऱ्याने तर १८/१९ व्या शतकात मराठी शब्दकोश आणि व्याकरण लिहून ते छापले होते असे माझ्या वाचनात आले आहे.
👉खरचं खूप चांगली मानस होती….
Comments
Post a Comment