आपल्या भारताला स्वातंत्र्य व इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काय योगदान आहे?
माझ्या बापाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काही योगदान नाही ..!! मग ? मी त्यासाठी अपराधी भावना ठेवावी काय की माझे देशप्रेम कमी आहे तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आहे त्यांनी गांधीला रोखठोकपणे विचारले होते की काँग्रेस च्या सदस्यांनी खादी घालणे जसे आवश्यक असते तसे अस्पृश्यता न पाळणे आवश्यक का करू नये गांधींनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले आणि
बाबासाहेब यांचे समोर दोन मार्ग होते १) गांधी समोर माघार घ्यावी आणि राजकीय नेते म्हणून गांधींच्या मर्जीत राहून प्रतिष्ठित म्हणून मिरवावे २) आपल्या समाज बांधवावर होणारा सामाजिक अन्याय , अत्याचार विरुद्ध कुणाची पर्वा न करता लढा देत राहावे बाबांनी दुसरा खडतर मार्ग स्वीकारला त्या साठी त्यानी स्पष्टपणे जाहीर केले की आवश्यक झाले तर मी ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्मामध्ये मारणार नाही
स्वातंत्र्य मिळाल्यावर घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ते काम केले आपल्या उद्दिष्टा प्रति शेवट पर्यंत प्रामाणिक राहण्याचा निर्णय त्यांनी निभावला आणि धर्मांतर जाहीरपणे केले हे जगातील एकमेवाद्वितीय उदाहरण आहे की कोणत्यातरी उदात्त कारणासाठी जाहीर धर्मांतर झाले
प्रत्येक व्यक्ती चे मूल्यमापन केवळ स्वातंत्र्य लढयातील योगदान ह्याच मुद्द्यावर होऊ शकत नाही समाजिक योगदान हे त्याहूनही मोठे आहे गांधी पेक्षा अधिक योगदान ,फुले, आगरकर, रानडे, शाहू महाराज, आंबेडकर यांनी दिले आहे आणि म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगतिशील आहे.
👉अतिशय सुंदर आणि सडेतोड उत्तर ! धन्यवाद सर! प्रश्नकर्त्या चा हेतुबद्दल साशंकता आहे.
👉देशा साठी योगदान म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ज्या समाजाची कोणीही दखल घेतली नाही ज्याना उपेक्षीत ठरवले त्यांच्या कडून अशी अपेक्षा करणे गैर आहे संविधानाच्या माध्यमातून जी सेवा केली आहे ती कमी आहे का
👉गांधी आणि स्वतंत्र अरे छे
Comments
Post a Comment