इंग्रजांनी सोने/पैसे लुटल्यामुळे भारत गरीब झाला की राजकारण्यांमुळे?

इंग्रजांनी सोने/पैसे लुटल्यामुळे भारत गरीब झाला की राजकारण्यांमुळे?

इंग्रज भारतात आले तेव्हा भारत जगातला सगळ्यात श्रीमंत देश होता. हे खरं आहे. इंग्रज व्यापार करायला आले होते. व्यापार करायला इंग्रज गरीब देशात का जातील?

भारत तेव्हा एवढं श्रीमंत आणि संपन्न होता की त्याची चर्चा जगभरात व्ह्यायची. म्हणूनच खुश्कीच्या किंवा इस्तंबूल चा मार्ग बंद झाला की मग वास्को द गामा भारताकडे येणारा नवीन रस्ता शोधायला निघाला. त्यावेळी त्याला ज्या राणीने कर्ज दिलं त्याच्या खूप विचित्र अटी होत्या.

पण तरीही त्याने ते कर्ज घेतलं. कारण ती पूर्ण युरोपची गरज होती. भारताकडे येण्यासाठी नवीन रस्ता शोधायची गरज काय? फक्त व्यापारात होणारा फायदा.

भारत तेव्हा सगळ्यात श्रीमंत देश होता आणि इंग्रज गेले तेव्हा भारताचा GDP केवळ 0.01% होता. ही विलक्षण आणि भयंकर वाताहत इंग्रजांच्या काळात झाली.

इंग्रजांनी फक्त जुलमी कायदे आणि धोरणं ह्यांनी भारताचे पैसेच नाही लुटले, तर भारताच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल भयंकर टीका आणि अपमान करून भारताचा मानसिक बलात्कार केला.

प्रत्येक भारतीय गोष्ट, श्रद्धा, मान्यता, परंपरा ह्यांना फक्त वाईट आणि मूर्खपणा म्हणणं एवढं धोरण कायम ठेवलं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की भारताला गरज आहे आत्मसन्मानाची.

इंग्रजांनी भारताला पूर्णतः नैराश्याच्या गर्तेत टाकलं.

भारतातले भिकार आणि दळभद्री पुढारी हे त्याच नैराश्याचे फळ.

नेहरूंपासून आता राहुल गांधी पर्यंत, सगळ्यांना काहीतरी चांगलं करायचं होतं. कोण माणूस असा असेल की ज्याला काहीच चांगलं करायचं नसेल? पण ही व्यवस्था, लोकांची मानसिकता ह्यात त्यांच्या कडून फार काही होऊ शकलं नाही. मग हळूहळू पराभवाचं शल्य त्यांना भ्रष्ट करत गेलं…

राजकीय नेते दळभद्री मिळतात तो समाज मुळातून दुःखी आणि आत्मवंचीत असतो. पण ही आत्मवंचना भारताला इंग्रजांनी दिलेली भेट आहे.

प्रश्न आहे की, ह्या भेटीचं आपण कशात रूपांतर करणार?

अन्याय झाला म्हणून रडत बसायचं की आपलं वैभव, संपन्नता आणि विशेषता परत मिळवण्यासाठी कष्ट करायचे?

मला वाटतं हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का??

👉भारताला इंग्रजांनी जवळ जवळ ५० ट्रिलियन डॉलर ला लुटले आहे. त्यांना भामटे, लुटारू, दरवडेखोर म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.

👉इंग्रजांमुळे नक्कीच जगातील दृष्टीने भारत गरिबीकडे वाहत राहिला पण सध्याची स्थिति राजकारण्यांनी बिकट करून ठेवली आहे फक्त वैशिष्ट्य पूर्ण व्यक्तीला अर्थसाहाय्य होईल असे धेय्य धोरण बनवत आहेत.

👉तेंव्हा भारतात मुघल साम्राज्य होता आणि त्यांनी भारताला श्रीमंत बनवले हे ही सत्य आहे.

👉नक्कीच आणि भारतातील तरुणाकडे कौशल्य आहे आणि दूरदृष्टी सुद्धा आपण आपल हरवलेलं वैभव ,संस्कृती आत्मसन्मान परत मिळवू शकतो.

👉हा पैसा परत मागून नाही का घेता येणार?

👉स्वत्व विसरलेला आणि इतरांचं अंधानुकरण करणारा समाज नेहमीच रसातळाला जात असतो….आपल्या कडे शिक्षक पेशा पूर्वी ब्राम्हणसमाजाकडे होता..पण आरक्षणामुळे ती संस्था नष्ट झाली. धर्माचा अभिमान बाळगणे हादेखील गुन्हा वाटावा इतकं भयानक वातावरण तयार केलं गेलं…

👉आगरकर वाचा , सावरकर वाचा म्हणजे भारताच्या आजच्या अवस्थेची कारणमीमांसा त्यांनी किती आधी केली होती ते समजेल. इंग्रजांनी भारत नाईलाजास्तव सोडला पण ते इतके कृतघ्न आणि सडक्या मनोवृत्तीचे आहेत की जाताना भारताचे धर्मा वरून तुकडे पाडले , जाती जातीत भांडण लावली आणि स्वतः च्या कळसूत्री बाहुल्या असलेल्या कर्तव्य हीन , भारतीय संस्कृती , परंपरा आणि हिंदू धर्मा बद्दल द्वेष असलेल्या अति शहाण्या त्यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या नेत्यां कडे सत्ता सोपवली.

👉कोणताही चोर, घुसखोर किंवा आक्रमणवादी हा संपत्ती लुटण्यासाठीच दुसऱ्या देशात / प्रांतात प्रवेश करत असतो त्यामुळे इंग्रजांनी भारतात येऊन लुट केली यात काहीच नवल नाही.

आपले राजकीय विचार काहीही असोत पण या विषयावर कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांची एक क्लिप युट्यूबवर उपलब्ध आहे ती अवश्य बघा. यात इंग्रज इथे येण्यापूर्वी भारताचा व्यापार काय आणि किती होता आणि नंतर भारतावर काय परिस्थिती उद्भवली याची माहिती आहे. तेव्हा इंग्रजांनी लुटले हे स्पष्टच आहे.

असे असूनही राजकारणी लोकांचे कर्तृत्व दुर्लक्षित करून चालणार नाही. यात काही टप्पे निश्चित करायचे झाल्यास नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आला. इंदिरा गांधीच्या काळात दिशा बदलायला लागली. १९९० नंतर मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर भ्रष्टाचारसुद्धा मुक्तपणे सुरु झाला जो थोड्या फार फरकाने आजतागायत सुरु आहे. त्यामुळे सर्व दोष हा इंग्रजांना देता येणार नाही तर राजकारणी लोकांनीसुद्धा भारताला भरपूर लुटले आहे.

तुमच्या प्रश्नात समाविष्ट नसले तरीही येथील नागरिकांनी काय कमी लुटले आहे का? ९० कोटी मतदार असलेल्या देशात ९ कोटी लोकं सुद्धा आयकर भरत नाहीत हे भूषणावह आहे का? भ्रष्टाचाराच्या नावाने खडे फोडणारे मतदार माहिती असूनही भ्रष्ट आणि गुन्हेगारांना निवडून देत असतील तर ते तरी दोषमुक्त कसे?

Comments

Popular posts from this blog

ब्रिटिशांनी जर अजून थोडा काळ भारतावर राज्य केले असते, तर आज भारत हा प्रगतशील देश असता का?